World Boxing Championship: निखत झरीननंतर लव्हलीनाचा 'गोल्डन पंच'; सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर बनली झरीन

World Boxing Championship: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये (World Boxing Championship)भारताच्या महिला बॉक्सरांनी देशाचा मान उंचावली आहे. निखत झरीनने ( Nikha zareen ) सुवर्ण पदक(   Gold Medal) मिळवल्यानंतर आता लव्हलीनाने गोल्ड पंच मारत सुवर्ण पदक मिळवलं.

Nikhat Zareen became the world champion boxer for the second time
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर बनली निखत झरीन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लव्हलीना बोर्गोहेनने सुवर्ण पदक मिळवलं.
  • लव्हलीनाने रविवारी 75 किलोग्राम वजनाच्या प्रकार सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं.
  • निखत झरीनने सलद दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप

नवी दिल्ली :  वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये (World Boxing Championship)भारताच्या महिला बॉक्सरांनी देशाचा मान उंचावली आहे. निखत झरीनने ( Nikha zareen ) सुवर्ण पदक(   Gold Medal) मिळवल्यानंतर आता लव्हलीनाने गोल्ड पंच मारत सुवर्ण पदक मिळवलं. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलीना बोर्गोहेनने दोनवेळा राष्ट्रकुल पदक विजेती ऑस्ट्रेलियाच्या केटलिन पार्करविरुद्ध विजय मिळवला आहे. ( World Boxing Championship:  Lovlina Borgohain golden punch; Zareen became World Boxing Champion)

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
लव्हलीनाने रविवारी 75 किलोग्राम वजनाच्या प्रकार सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. याआधी निखत झरीन ही दोन सुवर्णपदके जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली. निखतने रविवारी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या केडी जाधव हॉलमध्ये महिंद्रा आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा समारोप सुवर्णपदकासह केला.

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

आपल्या नावाला साजेशी लढाई करत निखतने (50 किलो)  च्या गटात आक्रमक प्रदर्शन केलं. दोनवेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या  व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. निखतचे हे सलग दुसरे वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद आहे. गतवर्षी तिने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. 

यावेळी तिने कमी वजनाच्या गटात स्पर्धा केली आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली. निखतने सामन्याच्या सुरुवातीपासूनच अचूक ठोसे मारले. तर व्हिएतनामच्या खेळाडूंचे हल्ले चुकवण्यासाठी तिने योग्य प्रकारे फुटवर्कचा उपयोग केला. त्याच्या मदतीने निखतने बाऊटमध्ये आपला दबाव कायम ठेवला.

अधिक वाचा  : वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

निखतनेने पहिल्या फेरीत दमदार कामगिरी केली आणि 5-0 अशी आघाडी घेतली. मात्र गुयेन थीने  दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन केले आणि ३-२ अशी बरोबरी साधत स्पर्धा रंजक ठेवली. पण अंतिम फेरीत निखतनेने संयम राखला आणि धडाकेबाज संघर्ष करत खेळातील आपण सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक का आहे हे दाखवून दिलं. 


सलग दोन सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय

अधिक वाचा  :  त्वचेसाठी टोमॉटो आहे फायदेशीर आहे, चेहरा होईल चमकदार


गेल्या वर्षी बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत झरीन ही पाचवी भारतीय महिला ठरली. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये एकापेक्षा जास्त सुवर्ण पदक जिंकणाऱ्या मेरी कोमनंतर झरीन ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सहा वेळा जगज्जेते ठरलेल्या मेरी कोमने 2002, 2005, 2006, 2008, 2010, 2018 या वर्षात वर्ल्ड चॅम्पियनशीपचं पदक पटकावले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी