ODI ranking:वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडला मोठा धक्का

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2022 | 11:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला धक्का देत अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडकडे 114 पॉईंट आहेत. तर इंग्लंड 113 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 

england team
ODI ranking:वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडला मोठा धक्का 
थोडं पण कामाचं
  • आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • न्यूझीलंडचे सध्या 114 पॉईंट आहेत. तर इंग्लंड 113 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम झाम्पा यांचा शानदार फॉर्म पाहायला मिळाला

मुंबई: इंग्लंडचा(england) संघ सध्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन(t-20 world champion) आहे. मात्र वनडेमध्ये(one day) ऑस्ट्रेलियाने त्यांची हालत खराब केली आहे. मंगळवारी संपलेल्या वनडे मालिकेत(one day seies) ऑस्ट्रेलियाने(australia) इंग्लंडला(england) 3-0 अशी मात दिली. यासोबतच इंग्लंडकडून अव्वल स्थान खेचून घेतले आहे. world champion england set back in odi ranking

अधिक वाचा - जास्त पाणी पिल्याने झाला होता ‘ब्रूस ली’चा मृत्यू

न्यूझीलंड टॉपवर

आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचे सध्या 114 पॉईंट आहेत. तर इंग्लंड 113 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर भारत आहे. टीम इंडियाचे 112 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया 112 अंकांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 107 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये त्यांनी आपले अव्वल स्थान गमावले आहे. इंग्लंडने न्यूझीलंडला या वर्षी सप्टेंबरमध्ये मागे टाकले होते. मात्र न्यूझीलंडने रँकिंग चार्टमध्ये आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असून ते पाकिस्तानहून पुढे गेले आहेत. 

सहा गुणांचे नुकसान

सध्याच्या वनडे वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी 119 रेटिंग अंक होते. मात्र या मालिकेत तीन सामन्यांच्या पराभवामुळे त्यांचे सहा अंकांचे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाचे आता 112 रेटिंग अंक आहेत जे भारताच्या रेटिंग गुणांसह आहे. मात्र भारताचे एकूण अंक अधिक आहेत.
इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची जबरदस्त कामगिरी

इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम झाम्पा यांचा शानदार फॉर्म पाहायला मिळाला. इंग्लडला पहिल्या दोन वनडेत अनुक्रमे सहा विकेट आणि 71 धावांनी पराभव झाला तर तिसऱ्या वनडेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वॉर्नर आणि हेड दोघांनी रेकॉर्ड भागीदारीत शतक केले. इंग्लडची पुढील वनडे मालिका पुढील वर्षी जानेवारीमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाही जानेवारीमध्ये द. आफ्रिकेसह तीन वनडे सामने खेळणार आहे. ही घरगुती मालिका असेल. 

अधिक वाचा - बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार

जगातील टॉप 10 वनडे टीम

न्यूझीलंड - 114 अंक
इंग्लंड - 113 अंक
भारत - 112 अंक
ऑस्ट्रेलिया - 112 अंक
पाकिस्तान - 107 अंक
द. आफ्रिका - 100 अंक
बांगलादेश - 92 अंक
श्रीलंका - 92 अंक
वेस्ट इंडिज - 71 अंक
अफगाणिस्तान - 69 अंक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी