AUS vs PAK, World Cup 2019: पाकिस्तानचा आणखी एक पराभव, ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 23:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

AUS vs PAK, World Cup 2019: विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ४१ धावांनी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. 

wahab_ap
पाकिस्तानचा आणखी एक पराभव, ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी  |  फोटो सौजन्य: AP

टॉन्टनः आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला आहे. पण या सामन्यात पाकिस्तानने शेवटपर्यंत लढत दिली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण डेव्हिड वॉर्नर (१०७) आणि एरॉन फिंच (८२) यांच्या खेळीच्या जोरावर ३०७ धावांचा डोंगर उभा केला. ३०८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ हा ४५. ४ ओव्हरमध्ये २६६ धावांवरच बाद झाला. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तिसरा विजय मिळवला आहे. 

३०८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सुरुवातीलाच सलामीवीर फखर जमान याला शून्यावरच बाद केलं. त्यानंतर आलेल्या बाबर आझमने ३० धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कूल्टर नाइलने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोहम्मद हाफिजने ४६ धावा केल्या. पण फिंचला मारण्याच्या नादात तो झेल बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार सर्फराजने शेवटपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. 

हसन अली आणि वहाब रियाज या दोन्ही फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत पाकिस्तानच्या आशा शेवटपर्यंत पल्लवित केल्या होत्या. पण स्टार्क आणि रिचर्डसन यांनी या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर स्टार्क आणि रिचर्डसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. दरम्यान पाकिस्तानने खेळलेल्या चार सामन्यांपैकी १ सामन्यातच विजय मिळवला आहे. दोन सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आता पुढील सर्व सामने त्यांना जिंकणं आवश्यक आहे. पाकिस्तानचा आता पुढचा सामना हा भारताशीच होणार आहे. त्यामुळे या सामन्यात ते कशी कामगिरी करतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. 

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळून देखील खूप मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ५० षटकात सर्व बाद ३०७ धावाच त्यांना करता आल्या. फिंच आणि वॉर्नर यांना वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांनी देखील शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली.  वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने १० षटकात फक्त ३० धावा देत तब्बल ५ बळी घेतले. पण तरीही पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवता आला नाही.  या सामन्यात शतक झळकावणाऱ्या वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
AUS vs PAK, World Cup 2019: पाकिस्तानचा आणखी एक पराभव, ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी Description: AUS vs PAK, World Cup 2019: विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ४१ धावांनी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola