वर्ल्डकपआधी राहुल आणि पांड्याला BCCI चा झटका, चॅट शो प्रकरणात ‘ही’ शिक्षा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 20, 2019 | 16:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

KWC Controversy: के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्याला एका आठवड्याच्या आत २०-२० लाख ही रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. जर त्यांनी ही रक्कम दिली नाही तर त्यांच्या मॅच फीमधून कापली जाईल.

Hardik Pandya and KL Rahul
हार्दिक पांड्या आणि केएल राहुल 

मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंटर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि बॅट्समन के. एल. राहुलच्या २०१९मधील वर्ल्डकप खेळण्यावर शिक्कामोर्तब झालंय. कारण फेमस फिल्म निर्माता करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये या दोन्ही खेळाडूंनी महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज त्याचा निकाल लागलाय. बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैननं राहुल आणि पांड्या दोघांवरही २०-२० लाख रुपयांचा दंड आकारलाय. जैननं हार्दिक पांड्या आणि केएल राहुलकडून मुंबईमध्ये नुकतीच भेट घेतली आणि यानंतर दोघांवर २०-२० लाखांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळं दोन्ही क्रिकेटपटूंना शांतता लाभली असेल. कारण या वादामुळे दोन्ही क्रिकेटपटूंचं करिअर संपेल, असं बोललं जात होतं.

बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला म्हटलं की, ते एक-एक लाख रुपये १० शहीद जवानांच्या विधवांना दंड स्वरूपात द्यावे आणि सोबतच १० लाख रुपये ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनला द्यावे, त्यानं या टीमला खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. राहुल आणि पांड्याला एक आठवड्याच्या आत ही रक्कम द्यावी लागेल. लोकपाल डी. के. जैन यांनी सांगितलं की, जर राहुल आणि पांड्या ठरवलेल्या काळात ही रक्कम देऊ शकले नाही तर त्यांच्या मॅच फीसमधून ही रक्कम कापली जाईल.

 

 

 

 

बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित निर्देशांनुसार जैन यांनी लिहिल की, पांड्या आणि राहुलवर पुढल्या खेळासाठी काही कडक कारवाई केली जाणार नाहीय. कारण तसंही दोघांनी निलंबन सहन केलेलं आहे आणि महिलांबद्दल त्यांच्या वक्तव्याची त्यांनी क्षमा पण मागितली आहे.

सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या लोकपालांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच पांड्या आणि राहुलला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पांड्या आणि राहुलला सीओएनं महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निलंबित केलं होतं. त्यानंतर आता त्यांचं आतंरराष्ट्रीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दोन्ही खेळाडू तेव्हा टीकाकारांच्या निशाण्यावर होते.

या वादग्रस्त भागाचं प्रसारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालं होतं. त्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. सीओएनं कडक कारवाई करत हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मध्येच परत बोलावलं होतं. दोघांनीही क्षमा मागितली आणि हा त्यांच्या करिअरमधील सर्वात कठीण काळ असल्याचं म्हटलं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वर्ल्डकपआधी राहुल आणि पांड्याला BCCI चा झटका, चॅट शो प्रकरणात ‘ही’ शिक्षा Description: KWC Controversy: के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्याला एका आठवड्याच्या आत २०-२० लाख ही रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. जर त्यांनी ही रक्कम दिली नाही तर त्यांच्या मॅच फीमधून कापली जाईल.
Loading...
Loading...
Loading...