IND vs PAK World Cup 2019: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 16, 2019 | 23:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan LIVE Score, ICC World Cup 2019, लाइव क्रिकेट स्कोअरः आज क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. या मॅचचे प्रत्येक लाइव्ह अपडेट पाहा. 

INDvsPAKLIVE
IND vs PAK LIVE Score: भारत वि. पाकिस्तान वनडे सामना  |  फोटो सौजन्य: Times Now

मॅनचेस्टर: वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवले. सामन्यात दोन वेळा पावसाचा व्यत्यय सुरू झाला. पाकिस्तानचा डाव सुरू असताना ३५व्या षटकादरम्यान पावसाचा खेळ सुरू झाला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार सामना ४० षटकांचा करण्यात आला तर या ४० षटकांत पाकिस्तानला ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करता आले नाही आणि भारताचा ८९ धावांनी विजय झाला. आतापर्यंत एकदाही पाकिस्तानला भारताविरुद्ध वर्ल्डकपमध्ये विजय मिळवता आलेला नाही. याही सामन्यात पुन्हा हेच दिसले.  याआधी भारताने ५० षटकांत ३३६ धावा केल्या. रोहित शर्माच्या दमदार १४० धावांच्या जोरावर भारताला तीनशेपार टप्पा गाठता आला. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीसाठी आलेल्या लोकेश राहुल आणि रोहित शर्माने भारताला चांगली सुरूवात करून दिली. रोहित शर्माने १४० धावांची दमदार खेळी साकारली. त्याने ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने ही खेळी केली. दुसरीकडे लोकेश राहुलने ५७ धावा केल्या. यात त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. 

तिसऱ्या स्थानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने ७७ धावांची खेळी केली. त्याने ६५ चेंडूत ७ चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने २६ धावांची खेळी केली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. सामन्याची तीन षटके बाकी असताना पावसाचा व्यत्यय आला आणि काही काळासाठी खेळ थांबला. मात्र पाऊस थांबल्यानंतर खेळण्यासाठी आलेला विराट कोहली लगेचच बाद झाला. भारताला ५० षटकांत ३३६ धावा करता आल्या.  

टीम इंडियाने दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी अष्टपैलू विजय शंकरला खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. तर तिकडे पाकिस्तानने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. पाकने आसिफ अलीऐवजी शाहीन अफरीदी यांच्या बदली इमाद वसीम आणि शादाब खान यांना संघात स्थान दिलं आहे. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व हे विराट कोहलीकडे आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदकडे आहे. सध्या पाकिस्तानी संघाचा विचार केल्यास पॉईंट टेबलमध्ये ते ३ गुणांसह नवव्या स्थानी आहेत. तर ५ गुणांसह टीम इंडिया चौथ्या स्थानी आहे. दोन्ही संघाचे एक-एक सामने हे पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून महत्त्वपूर्ण २ अकांची कमाई करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. 

 

 

IND vs PAK LIVE स्कोअर कार्ड:

पाकिस्तानचा डाव

 1. भारताचा डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी विजय 
 2. पाकिस्तानला जिंकण्यासाठी ३०२ धावांची गरज
 3. पावसामुळे खेळ थांबला असून पाकिस्तानने ६ विकेटचे नुकसान सहन करत ३५ ओव्हरमध्ये १६६ धावा काढल्या आहेत.  
 4. पाकिस्तानचा सहावा गडी पवेलियनला परतला. विजय शंकरच्या गोलंदाजीवर कर्णधार सर्फराज अहमद बाद  
 5. टीम पाकिस्तानच्या ३१.५ ओव्हरमध्ये १५० धावा
 6. पाकिस्तानने पाचवी विकेट गमवली हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर शोएब मलिक बाद 
 7. पाकिस्तानला चौथा धक्का मोहम्मद हफीझ बाद. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर विजय शंकरने घेतला कॅच
 8. पाकिस्तानला तिसरा धक्का फखर जमान बाद  कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर युजवेंद्र चहलने घेतला कॅच  
 9. पाकिस्तानला दुसरा धक्का कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आझम बाद  
 10. फखर जमान आणि बाबर आझम यांची १०९ बॉलमध्ये १०० धावांची भागेदारी 
 11. पाकिस्तानचे शतक २१.४ ओव्हरमध्ये १०२ धावा पूर्ण
 12. फखर जमानचे अर्धशतक पूर्ण फखर जमानने ५९ बॉलमध्ये ५० धावा काढल्या
 13. टीम पाकिस्तानच्या २० ओव्हरमध्ये ८७ धावा
 14. पाकिस्तान संघाला विजयासाठी ३२ ओव्हरमध्ये २५२ धावांची गरज
 15. टीम पाकिस्तानच्या १८ ओव्हरमध्ये ८४ धावा
 16. टीम पाकिस्तानच्या १५ ओव्हरमध्ये ६४ धावा 
 17. टीम पाकिस्तानच्या १२.५ ओव्हरमध्ये ५० धावा पूर्ण 
 18. पाकिस्तान धावसंख्या: १० ओव्हरमध्ये ३८ धावा, एक विकेटचं नुकसान   
 19. पाकिस्तानला पहिला धक्का इमाम-उल-हक बाद. विजय शंकरच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यु आऊट  
 20. पाकिस्तानचे सलामी फलंदाज फकर जमान आणि इमाम-उल-हक मैदानात दाखल    
 21. पाकिस्तानसमोर विजयासाठी ५० ओव्हरमध्ये ३३७ धावांचे लक्ष्य
 22. पाकिस्तानचा डाव सुरू झाला आहे. 

भारताचा डाव

 1. टीम इंडियाचे पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे आव्हान
 2. टीम इंडियाच्या ५० ओव्हरमध्ये ३३६ धावा
 3. टीम इंडियाच्या ४८ ओव्हरमध्ये ३१५ धावा
 4. टीम इंडियाला पाचवा धक्का कर्णधार विराट कोहली बाद. मोहम्मद आमिरच्या गोलंदीजीवर सर्फराज अहमदने घेतला कॅच.
 5. पाऊस थांबल्याने खेळाला पुन्हा सुरूवात
 6. पावसामुळे खेळ थाबंला
 7. टीम इंडियाच्या ४५.४ ओव्हरमध्ये ३०० धावा पूर्ण  
 8. भारताला चौथा गडी तंबुत परतला; महेंद्रसिंग धोनी बाद, मोहम्मद आमिरच्या गोलंदीजीवर सर्फराज अहमदने घेतला कॅच
 9. विराट कोहलीचे वन डे करिअरमध्ये ११००० धावांचे लक्ष्य पूर्ण 
 10. भारताला तिसरा धक्का हार्दिक पांड्या बाद, मोहम्मद आमिरच्या गोलंदजीवर बाबर आझमने घेतला कॅच
 11. विराट कोहलीचे अर्धशतक ५२ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण
 12. टीम इंडियाच्या ४३ ओव्हरमध्ये २७४ धावा पूर्ण, दोन विकेट 
 13. टीम इंडियाच्या ४०.४ ओव्हरमध्ये २५० धावा पूर्ण
 14. रोहित शर्माने ११३ बॉलमध्ये १४ चौकार ३ षटकार ठोकत १४० धावा काढल्या आहेत.
 15. भारताला दुसरा धक्का रोहित शर्मा बाद, हसन अलीच्या गोलंदाजीवर वहाब रियाजने घेतला कॅच
 16. टीम इंडियाचे द्विशतक पूर्ण ३४.२ ओव्हरमध्ये २०० धावा 
 17. रोहित शर्माच्या ८५ बॉलमध्ये १०० धावा पूर्ण 
 18. भारत धावसंख्या: १६० धावा, एक विकेट; २७ ओव्हर
 19. टीम इंडियाच्या २५.४ ओव्हरमध्ये १५० धावा पूर्ण
 20. भारताची धावसंख्या २४.५ ओव्हरमध्ये १४६ धावा; एक विकेटच्या नुकसानीवर 
 21. भारताला पहिला धक्का लोकेश राहुल बाद.वहाब रियाजच्या गोलंदाजीवर बाबर आझमने घेतला कॅच  
 22. ​लोकेश राहुलचे अर्धशतक पूर्ण ७० बॉलमध्ये ५१ धावा काढल्या 
 23. टीम इंडियाच्या २१ ओव्हरमध्ये ११२ धावा, एकही विकेट नाही.
 24. भारताचे शतक पूर्ण १७.३ ओव्हरमध्ये १०० धावा पूर्ण 
 25. भारत धावसंख्या: 83 धावा, १५ ओव्हर  
 26. टीम इंडियाच्या १३ ओव्हरमध्ये ८० धावा, एकही विकेट नाही.
 27. रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण ३४ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण
 28. टीम इंडियाच्या १० ओव्हरमध्ये ५३ पूर्ण 
 29. भारत धावसंख्या: २० धावा, एकही विकेट नाही; ५ ओव्हर 
 30. भारतीय संघाची सावध सुरुवात, पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव नाही.
 31. भारतीय संघात केवळ एकच बदल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धवनऐवजी विजय शंकरला संधी
 32. पाकिस्तानचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, भारताची प्रथम फलंदाजी

दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी मॅनचेस्टरमध्ये हजारो भारतीय नागरिकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण मैदानात भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संघ: सर्फराज अहमद (कर्णधार/विकेटकीपर), फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शोएब मलिक, इमाद वसीम, मोहम्मद हफीझ, शादाब खान, हसन अली, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs PAK World Cup 2019: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय Description: India vs Pakistan LIVE Score, ICC World Cup 2019, लाइव क्रिकेट स्कोअरः आज क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. या मॅचचे प्रत्येक लाइव्ह अपडेट पाहा. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola