World Cup 2019: विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघ जाहीर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 15, 2019 | 16:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 India team players: विश्वचषक २०१९ साठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने मुंबईतील बैठकीनंतर बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा केली आहे.

 WC_India_AP
World Cup 2019: विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघ जाहीर (@BCCI)  |  फोटो सौजन्य: AP, File Image

मुंबई: इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक २०१९ साठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषक सामन्यासाठी १५ जणांच्या चमूची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीने विश्वचषकासाठी या १५ खेळाडूंची निवड केली आहे. निवड समितीने काहीसा अपेक्षेप्रमाणेच संघ जाहीर केला आहे. या संघात नवख्या रिषभ पंतला स्थान देण्यात आलेलं नाही. त्याऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. याशिवाय रवींद्र जडेजालाही संघात स्थान मिळालं आहे. दुसरीकडे अंबाती रायुडूला मात्र संघातून वगळण्यात आलं आहे. 

२०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक पटकावला होता. यंदा देखील भारतीय संघ या विश्वचषक संघातील प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्यामुळे आता या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच आशा लागून राहिल्या आहेत. 

क्रिकेट विश्वचषक २०१९ साठीचा भारतीय संघ (टीम इंडिया): 

 1. विराट कोहली (कर्णधार) 
 2. रोहित शर्मा (उपकर्णधार)
 3. एमएस धोनी
 4. केदार जाधव 
 5. हार्दिक पांड्या 
 6. कुलदीप यादव 
 7. युजवेंद्र चहल 
 8. जसप्रीत बुमराह 
 9. भुवनेश्‍वर कुमार 
 10.  मोहम्‍मद शमी 
 11.  रवींद्र जडेजा
 12.  दिनेश कार्तिक
 13.  विजय शंकर
 14.  शिखर धवन
 15.  के.एल. राहुल

 

 

 

क्रिकेट विश्वचषक २०१९, महत्त्वाच्या गोष्टी 

क्रिकेट विश्वचषक २०१९ चं आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आलं आहे. विश्वचषकाची सुरूवात ३० मे पासून होणार आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना १४ जुलैला असणार आहे. यावेळी मालिका ही राऊंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ हा एकमेकांशी एक-एकदा भिडणार आहे. विश्वचषकात एकूण १० संघांचा समावेश आहे. जे ४८ सामने खेळतील. विश्वचषकाचा पहिला सामना हा ओव्हल मैदानात खेळविण्यात येणार आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना हा लॉर्ड्सवर खेळविण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये पाचव्यांदा विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघ जाहीर Description: World Cup 2019 India team players: विश्वचषक २०१९ साठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने मुंबईतील बैठकीनंतर बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा केली आहे.
Loading...
Loading...
Loading...