फोर्ब्सच्या यादीत पीव्ही सिंधू एकमेव भारतीय, 'एवढ्या' कोटींची कमाई

PV Sindhu in Forbes list: ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने थेट फोर्ब्सच्या यादीत स्थान पटकावण्याची करामत केली आहे. 

PV_Sindhu_IANS
फोर्ब्सच्या यादीत पीव्ही सिंधू एकमेव भारतीय, 'एवढ्या' कोटींची कमाई  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू थेट फोर्ब्सच्या यादीत
  • सिंधूने आतापर्यंत साधारण ५५ लाख डॉलर एवढी कमाई केलीए
  • फोर्ब्सच्या श्रीमंत महिला अॅथलिटच्या यादीत सिंधू १३ व्या स्थानी

मुंबई: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचं नाव सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अॅथलिट्सच्या फोर्ब्सच्या यादीत आलं आहे. फोर्ब्सच्या यादीत पीव्ही सिंधू ही १३व्या स्थानी आहे. या यादीत अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विलियम्स ही अव्वल स्थानी आहे. पीव्ही सिंधूची एकूण कमाई ही ५५ लाख डॉलर एवढी आहे. ज्याच्या आधारावर ती अमेरिकन टेनिस स्टार आणि २०१८ फ्रेंच ओपन आणि अमेरिका ओपन रनर अप मेडिसन कीसच्या सोबत संयुक्तरित्या १३व्या स्थानी आहे. 

फोर्ब्सच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, 'सिंधू ही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला अॅथलिट आहे. तिच्याजवळ ब्रिजस्टोन, जेबीएल, गटोराडे, पॅनासॉनिक आणि अन्य मोठ्या उत्पादनांच्या जाहिराती आहेत. तसंच ती २०१८ मध्ये सीझन एंडिंग बीडब्ल्यूएफ वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.' यादीत सर्वाधिक महिला टेनिस खेळाडूच आहे. ज्यामध्ये फक्त पीव्ही सिंधू आणि थायलंडची गोल्फ खेळाडू अरिया जुतानुगार्न हिचा समावेश आहे. पीव्ही सिंधू ही १३व्या स्थानी आहे. तर अरिया हिने या यादीत १५वं स्थान पटकावलं आहे. 

दरम्यान, सेरेना विलियम्स हिची कमाई तब्बल २.९२ कोटी डॉलर एवढी आहे. यामुळेच सर्वाधिक श्रीमंत महिला अॅथलिटच्या यादीत ती टॉपवर आहे. २०१९ अमेरिका ओपनची विजेती नाओमी ओसाका ही २.४३ कोटी डॉलरच्या कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. तर जर्मनीची टेनिस स्टार एंजेलिका केरबर ही १.१८ कोटी डॉलरच्या कमाईसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. 

पीव्ही सिंधू हिने आपल्या कामगिरीच्या जोरावर आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत. २०१६ ऑलम्पिकमध्ये तिने रौप्य पदक पटकावून मोठा इतिहास रचला आहे. तेव्हापासून तिची आतंरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी देखील उंचावली आहे. यामुळेच अनेक मोठ्या जाहिरात कंपन्यांनी सिंधूसोबत करार केले आहेत. त्यामुळेच तिच्या कमाई प्रचंड वाढ झाली आहे. 

सध्या सिंधू कमाई जरी बरीच करत असली तरीही सध्या तिचं पूर्ण लक्ष हे २०२० ऑलम्पिककडे लागून राहिलं आहे. कारण गेल्या ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची हुकलेली संधी यंदा तिला अजिबात गमवायची नाही. त्यासाठीच प्रशिक्षक गोपीचंद पुलेला यांच्या गाईडन्सनुसार ती सध्या खेळते आहे. यासाठी तिचा सराव देखील कसून सुरु आहे. जपान ऑलम्पिकमध्ये सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करावी अशीच सगळ्या भारतीयांची इच्छा आहे. सिंधूने अगदी कमी वयातच चमकदार कामगिरी करुन संपूर्ण देशवासियांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हैदराबादमध्ये राहणाऱ्या सिंधूने अतिशय लहान वयापासून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला गोपीचंद पुलेला यांच्या अकादमीत घातलं. तेव्हापासून सिंधूला खेळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता आला. ज्याचा तिला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड फायदा होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
फोर्ब्सच्या यादीत पीव्ही सिंधू एकमेव भारतीय, 'एवढ्या' कोटींची कमाई Description: PV Sindhu in Forbes list: ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने थेट फोर्ब्सच्या यादीत स्थान पटकावण्याची करामत केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...