वर्ल्‍ड नंबर-1 भारताकडून वर्ल्ड चॅंपियन ऑस्‍ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

IND vs AUS 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला गेले. भारतीय संघासाठी हा सामना करा किंवा मरो अशी स्थिती होती. ऑस्ट्रेलियाने पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना चार विकेटने जिंकला. नागपुरात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचं लक्ष्य दिलं. भारतीय संघाने शेवटच्या षटकात चार विकेट गमावून पूर्ण केले.

World No.-1 India beat world champion Australia by 6 wickets, level series 1-1
वर्ल्‍ड नंबर-1 भारतकडून वर्ल्ड चॅंपियन ऑस्‍ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 90 धावा केल्या
  • रोहितची शानदार खेळी
  • भारताने हा सामना 4 चेंडू बाकी असताना 6 विकेटने जिंकला. कार्तिकने मॅचविनिंग फोर मारल्या.

India vs Australia 2nd T20: नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान भारतीय संघाने शेवटच्या षटकात चार विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. (World No.-1 India beat world champion Australia by 6 wickets, level series 1-1)

अधिक वाचा : Sachin Tendulkar: ...म्हणून सचिनसारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही!, 49 व्या वर्षी केलं भन्नाट काम

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावा केल्या. 20 चेंडूंच्या झंझावाती खेळीत हिटमॅनने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारून टीम इंडियाला चार चेंडू आधीच विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने नाबाद 43 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. फिंचच्या बॅटमधून चार चौकार आणि एक षटकार आला. टीम इंडियासाठी अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या दोन षटकांत केवळ 12 धावा देऊन दोन महत्त्वाचे बळी घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी