Nz Vs Ban: आतापर्यंतचा सगळ्यात वाईट रिव्ह्यू, बांगलादेशच्या निर्णयावर हसले कमेंटेटर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 04, 2022 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nz Vs Ban, Worst Review Ever: तस्कीन अहमदचा बॉल जेव्हा रॉस टेलरच्या बॅटवर लागला तेव्हा बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. तस्कीन अहमदने यॉर्कर लेंथ बॉल टाकला जो रॉस टेलरच्या पायांजवळ जाऊन लागला. अंपायरने नाबाद म्हणून घोषित केले मात्र बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. 

reviews
Nz Vs Ban: आतापर्यंतचा सगळ्यात वाईट रिव्ह्यू 
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा दमदार खेळ
  • व्हायरल होतोय रिव्ह्यूचा हा व्हिडिओ

मुंबई: सामन्यात खेळताना जोशमध्ये अनेकदा असे निर्णय घेतले जातात ज्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येते. असेच काहीसे बांगलादेश(bangladesh) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यातील कसोटी सामन्यात(test match) पाहायला मिळाले. जेव्हा बांगलादेश संघाने एक असा रिव्ह्यू(review) घेतला जे पाहून कमेंटेटर्सनाही आपले हसू आवरले नाही. न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने आहेत. बांगलादेशने जबरदस्त खेळ करत न्यूझीलंड संघाची स्थिती खराब केली आहे. यादरम्यान सामन्यात असे काही घडले की साऱ्यांनाच आपले हसू आवरता आले नाही. worst review in the history of cricket in Bangladesh vs new Zealand match

तस्कीन अहमनदचा बॉल जेव्हा रॉस टेलरवच्या बॅटवर लागला तेव्हा बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. तस्कीन अहमदने यॉर्कर लेंथ बॉल टाकला. हा बॉल जाऊन रॉस टेलरच्या पायाजवळ जाऊन लागला. अंपायरने याला नाबाद घोषित केले. मात्र बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. जेव्हा रिप्ले पाहिला तेव्हा पाहिले की बॉल तर बॅटच्या मधोमध लागला आहे. रिप्ले पाहून कमेंटेटर्सनाही हसू आवरले नाही. अंपायरचा निर्णय योग्य होता. बॉलरचे बोलणे ऐकून बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने हा रिव्ह्यू घेतला मात्र तो चांगलाच महागात पडला. संघाला आपला एक रिव्ह्यू गमवावा लागला. 

सोशल मीडियावरही लोक या रिव्ह्यूचा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. आतापर्यंत हा सगळ्यात वाईट रिव्ह्यू असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. बांगलादेशने या सामन्यात जबरदस्त खेळ केला. पहिल्या डावात न्यूझीलंडचा डाव ३२८ धावांवर गुंडाळला त्यानंतर बांगलादेशने ४५८ धावा केल्या. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची स्थिती वाईट आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी