MI vs DC WPL Final match live streaming score updates: महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या सीझनमधील फायनल मॅच मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात रंगणार आहे. वूमन्स प्रीमिअर लीग (WPL) च्या पहिल्या सीझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या टीमने आठपैकी सहा मॅचेस जिंकल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या टीमने आठ मॅचेसपैकी सहा मॅचेस जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा रनरेट अधिक असल्याने मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे. जाणून घ्या या फायनल मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल.
हे पण वाचा : हा पदार्थ विराटला अजिबात आवडत नाही, मात्र त्याच्या सेवनाचे असंख्य फायदे आहेत
महिला प्रीमिअर लीगमधील फायनल मॅच 26 मार्च रोजी खेळवण्यात येईल. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
Dominant @DelhiCapitals will take on the mighty @mipaltan in the inaugural #TATAWPL final 🏆 — Women's Premier League (WPL) (@wplt20) March 25, 2023
Tune in tomorrow & watch LIVE on @JioCinema and @Sports18 pic.twitter.com/9pbcAQKa6x
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारी फायनल मॅच मुंबईतील ब्रेब्रोर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
हे पण वाचा : कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारी फायनल मॅच तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर लाईव्ह पाहू शकता.
महिला प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या फायनल मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जिओ सिनेमा अॅपवर पाहू शकता. तसेच अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणारी फायनल मॅच ही संध्याकाळी 6.30 वाजता तुम्ही लाईव्ह पाहू शकता.