The Great Khali : भारतीय WWE स्टार द ग्रेट खली (The Great Khali) पन्नाशीचा (Fifty) झालाय. याच आठवड्यात त्याने आपला पन्नासावा वाढदिवस (Birthday) साजरा केला. 2006 साली त्याने WWE मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 सालापर्यंत त्याने जगातील एकाहून एक सरस पैलवानांना आपल्या ताकदीनं धूळ चारली होती. खली हे नाव जगभरात गाजलं होतं. ताडमाड उंची, अगडबंब देह आणि राक्षसी ताकद यांच्या जोरावर त्याने WWE मध्ये आपला वेगळाच ठसा उमटवला होता. गेल्या वर्षीच WWE नं मानाचा पुरस्कार देऊन खलीचा सन्मान केला आहे. कंपनीनं खलीला त्यांच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देत त्याचा गौरव केला आहे.
खली हा आता भारतातील एक मोठा सुपरस्टार झाला आहे. WWE मध्ये आपला धमाकेदार परफॉर्मन्स दाखवल्यानंतर आता भारतीय राजकारणातही त्याने एन्ट्री केली आहे. काही वर्षांपूर्वी त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अर्थात, त्यानंतर त्याने कुठलीही निवडणूक लढवलेली नाही किंवा पक्षाच्या कामात तो सक्रीय असल्याचंही दिसलं नाही. WWE सोडून इतकी वर्षं होऊनही खलीच्या संपत्तीत मात्र घट झालेली नाही. आजही त्याची मजबूत कमाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एका रिपोर्टनुसार खलीकडे असणारी एकूण संपत्ती 6 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 44 कोटी रुपये एवढी आहे.
अधिक वाचा - भारताच्या शॉर्ट बॉलने केला पाकिस्तानचा घात
खली सध्या आपली कुस्ती प्रशिक्षणाची संस्था चालवतो आणि अनेक विद्यार्थ्यांना कुस्तीचं प्रशिक्षण देतो. त्याचे कित्येक शिष्य सध्या WWE मध्ये काम करतात. त्याचप्रमाणं इन्स्टाग्राममुळेही खली बराच चर्चेत असतो. खली असे कुठले ना कुठले व्हिडिओ टाकत असतो, ज्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी फॅन्सनी त्याच्या पोस्टवर अत्यंत आक्षेपार्ह कमेंट्स करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला कमेंट सेक्शन बंद करावा लागला होता. इन्स्टाग्राममुळे खली अधिकच प्रसिद्ध झाला आहे. खलीनं टाकलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः इन्स्टाग्रामवर गर्दी होते.
अधिक वाचा - IND vs PAK: कोहलीचा तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळणारा विराट ठरला जगातील दुसरा क्रिकेटपटू
जगातील उत्तमोत्तम मल्ल ज्या ठिकाणी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत असतात, त्या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करणाऱ्या खलीबाबत भारतीय तरुणांच्या मनात अपार प्रेम आहे. अनेकदा त्याने भलाभल्या मल्लांना पाणी पाजल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. खलीने आपल्यासारखेच गुणवान मल्ल आपल्या अकॅडमीतून तयार करावेत आणि अधिकाधिक भारतीय मल्ल परदेशात जाऊन यशस्वी व्हावेत, अशा शुभेच्छा चाहते त्याला देत आहेत.