योगेश्वर दत्त आणि संदीप सिंह यांचा भाजप प्रवेश, हरियाणा विधानसभेत 'या' जागेवर निवडणूक लढणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि प्रसिद्ध ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन्ही खेळाडू हरियाणामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Sandeep Singh And Yogeshwar Dutt
योगेश्वर दत्त आणि संदीप सिंह यांचा भाजप प्रवेश, हरियाणामधून निवडणूक लढण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भारताचे दोन स्टार खेळाडू कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
  • ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकवणारा कुस्तीपटून योगेश्वर दत्त आणि प्रसिद्ध ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह यांना गुरूवारी पक्षाची प्राथमिक सदस्यता मिळाली.
  • दोन्ही खेळाडूंनी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे हरियाणाचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

नवी दिल्लीः भारताचे दोन स्टार खेळाडू कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकवणारा कुस्तीपटून योगेश्वर दत्त आणि प्रसिद्ध ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह यांना गुरूवारी पक्षाची प्राथमिक सदस्यता मिळाली. दोन्ही खेळाडूंनी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे हरियाणाचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. पक्ष दोन्ही खेळाडूंना आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. योगेश्वर बरोदा या जागेवरून आणि संदीप सिंह यांना सिरसा या जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

योगेश्वर दत्त गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थक राहिलेत. दत्त हा पंतप्रधान मोदींचा मोठा चाहता आहे.  ट्विटरवर दत्त राष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर चांगलाच निशाणा साधताना दिसतो. असं मानलं जातं होतं की, तो येत्या काळात पक्षात सामील होऊ शकतो. 

 

 

योगेश्वर दत्तनं 2012 ला लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर त्याला पद्मश्रीनं देखील सन्मानित करण्यात आलं. त्यानं 2010 साली दिल्ली आणि 2014 ला ग्लास्गोमध्ये आयोजित राष्ट्रकुल खेळात सुवर्ण पदक जिंकलं होतं. 2014 मध्ये इंचियोनमध्ये आयोजित आशियाई खेळात सुद्धा दत्तनं सुवर्ण पदत पटकावलं होतं. मुळाचा हरियाणातल्या सोनीपतचा राहणारा 36 वर्षीय योगेश्वर दत्त दिल्लीत राहतो. अशातच असं मानलं जातं आहे की, हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यासाठी त्यानं हरियाणा पोलीस दलातील डीएसपी पदाचा राजीनामा दिला. 

 

 

तर भारतीय हॉकी टीमचा माजी कर्णधार संदीप सिंह सुद्धा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीआधी पक्षात प्रवेश केला आहे. संदीप मुळचा हरियणाच्या कुरूक्षेत्र जिल्ह्यातल्या शाहबाद कस्बेमध्ये राहणारा आहे. त्याची ओळख जगभरात एक शानदार ड्रॅग फ्लिकर अशी राहिली आहे. संदीप सिंह एक दुर्घटनामध्ये गोळी लागल्यानंतर मैदानापासून दूर झाला. डॉक्टरांनी हॉकीच्या मैदानावर त्याच्या वापसी अशक्य असल्याचं म्हटलं होतं.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना योगेश्वर दत्तनं म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि याचमुळे मी भाजपमध्ये सहभागी झालो आहे. तसंच मी लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...