Sarah Taylor: इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचे अनोखे फोटोशूट; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 04, 2022 | 18:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sarah Taylor | : इंग्लंडची दिग्गज महिला विकेटकिपर फलंदाज सारा टेलर केवळ तिच्या खेळासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही क्रिकेट विश्वात प्रसिध्द आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी विश्वचषकादरम्यान चाहत्यांना साराची उणीव भासली. यादरम्यान तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, जे पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. आजही हे फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत.

You too will be shocked to see the unique photoshoot photos of England women's cricketers
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचे अनोखे फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडची दिग्गज महिला विकेटकिपर फलंदाज सारा टेलर सध्या चर्चेत आहे.
  • सारा टेलरने एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केले.
  • काही लोकांनी सारा टेलरवर जोरदार टीका केली.

Sarah Taylor | नवी दिल्ली : इंग्लंडची दिग्गज महिला विकेटकिपर फलंदाज सारा टेलर केवळ तिच्या खेळासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही क्रिकेट विश्वात प्रसिध्द आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी विश्वचषकादरम्यान चाहत्यांना साराची उणीव भासली. यादरम्यान तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, जे पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. आजही हे फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत. मात्र काही चाहते असे देखील आहेत ज्यांनी या फोटोंना नापसंती दर्शवली. (You too will be shocked to see the unique photoshoot photos of England women's cricketers). 

अधिक वाचा : भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल 

टॉपलेस फोटो पाहून चाहते थक्क

सारा टेलरने एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तिने फक्त ग्लब्ज घातले होते आणि बॅटच्या साहाय्याने काही सुंदर शॉट्सही खेळत होती. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर ते पाहताच व्हायरल झाले. या फोटोंनी संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले. अनेकांना हे फोटो आवडले असले तरी सारा टेलरचा हा अनोखा लूक अनेक चाहत्यांना आवडला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Taylor (@sjtaylor30)

अधिक वाचा : गोरखनाथ मंदिरावर हल्ला, ATS चा तपास सुरू

टीकेची पर्वा केली नाही

काही लोकांनी सारा टेलरवर जोरदार टीका केली आणि तिला वाईट म्हटले, परंतु साराने याची पर्वा केली नाही. सारा टेलर सोशल मीडियावर खूर सक्रिय असते. या मुद्द्यावर तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून तिची बाजू मांडली आहे. तिने लिहले की, "काही लोकांना माहित आहे की मी हे काम माझ्या आवाक्याबाहेर केले आहे. पण मला स्वत:चा अभिमान आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. प्रत्येक स्त्री खूप सुंदर असते." 


चाहतेही मदतीला धावले 

काही लोकांना असे वाटते आहे की साराने क्रिकेटला लाजवेल असे कृत्य केले आहे. मात्र अनेक चाहत्यांनी या महिला क्रिकेटचा बचावही केला. या फोटोंमध्ये सारा सुंदर दिसत असून काहीही लाजवेल असे नाही असे काही चाहत्यांनी म्हटले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Taylor (@sjtaylor30)

आता कोचिंगमध्ये सक्रिय

साराने शेवटच्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०१९ मध्ये खेळले होते मात्र त्यानंतर तिला संघात स्थान मिळू शकले नाही. साराने अलीकडेच फेब्रुवारी २०२२ मध्ये मँचेस्टर ओरिजिनल्स क्रिकेट क्लबसोबत सहाय्यक प्रशिक्षक करारावर स्वाक्षरी केली. लक्षणीय बाब म्हणजे तिचा संघ द हंड्रेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी उतरणार आहे. सारा या क्लबमधील केवळ महिलाच नाही तर पुरूष संघाचे देखील प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी