India-Australia 1st ODI: वानखेडे मैदानावर  सामन्यादरम्यान CAA चा विरोध करत तरूणाईची निदर्शनं

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना झाला. केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायद्या विरोधात देशभर तीव्र आंदोलन होत आहे. त्याचीच झळ या सामन्यालाही बसल्याचं दिसून आलं. 

protesting Anti-CAA during India-Australia 1st ODI
वानखेडे मैदानावर  सामन्यादरम्यान CAA चा विरोध करत तरूणाईची निदर्शनं 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना झाला. पहिल्या वनडेत भारतानं दिलेल्या 255 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं सहज पूर्ण करत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मात्र या दरम्यान एक वेगळा प्रकार दिसण्यात आला. केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायद्या विरोधात देशभर तीव्र आंदोलन होत आहे. त्याचीच झळ या सामन्यालाही बसल्याचं दिसून आलं. 

मैदानावर सामना बघण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी CAA आणि NRC  याचा निषेध केला. यावेळी काही तरूण आणि तरूणींनी NO CAA – NO NRC  असं लिहिलेले टीशर्ट घातले होते आणि केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध दर्शवला. वानखेडे मैदानावर सामन्यादरम्यान या तरूणाईनी केलेला निषेध सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यांनी वेगळ्या पद्धतीचा निषेध नोंदवला आहे. या निषेधाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. 

टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव 

डेविड वॉर्नर (128*) आणि कॅप्टन अॅरोन फिंच (110*) या जोडीनं वादळी शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियानं मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पहिल्या वनडेत भारताचा सहजतेनं 10 विकेट्स राखत पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अॅरोन फिंचनं टॉस जिंकून कोहली ब्रिगेडला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय टीम 49.1 ओव्हरमध्ये 255 रन करून ऑलआऊट झाली. टीम इंडियानं दिलेल्या 255 रन्सचं आव्हान घेऊन ऑस्ट्रेलियाच्या टीमनं 37.4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता आपलं लक्ष्य पूर्ण केलं. यासोबतच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्याच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आगेकूच केली आहे. या सीरिजचा दुसरा सामना राजकोटमध्ये शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. 

ऑस्ट्रेलियाची धमाकेदार सुरूवात 

ऑस्ट्रेलियाला ओपनर्स अॅरोन फिंच आणि डेविड वॉर्नरनं धमाकेदार सुरूवात करून दिली. दोघांनी भागेदारी करत शतक ठोकलं. यावेळी वॉर्नरनं आपल्या वनडे करियरमधलं 21 वं अर्धशतक केलं. त्यानं 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं हाफ सेंन्चुरी केली. तर फिंचनं आपल्या वनडेतल्या करिअमधलं 25 वं अर्धशतक पूर्ण केलं. फिंचनं 52 बॉलमध्ये 8 चौकार आणि एक षटकारच्या मदतीनं अर्धशतक लगावलं. 

वॉर्नर आणि फिंच यावरच थांबले नाहीत. वॉर्नरनं 88 बॉलमध्ये 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं आपलं वनडेतल्या करिअरमधलं 18 वं शतकं ठोकलं. त्यानंतर फिंचनं 108 बॉलमध्ये 12 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं वनडेतल्या करिअमधलं 16 वं शतक लगावलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी