मुंबई: युवराज सिंह(yuvraj singh) टीम इंडियाचा(team india) एक असा क्रिकेटर होता ज्याच्या फॉर्मने तो साऱ्यांनाच हैराण करत असे. आपल्या जबरदस्त खेळीमुळे तो एकेकाळी कर्णधारपदाचा(captaincy) मोठा दावेदार मानला जात होता. युवराज सिंहने काही काळाआधी एक आश्चर्यजनक खुलासा केला होता की कशा पद्धतीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या(sachin tendulkar) कारणामुळे त्याच्या हातून कर्णधार बनण्याची संधी गेली होती ते. Yuvraj singh could not became captain due to this dispute
अधिक वाचा - ही लक्षणं दिसली तर लगेच थांबवा मद्यपान
युवराज सिंहने काही काळाआधी स्पोर्ट्स १८वर एका मुलाखतीदरम्यान स्वत:ला कर्णधारपद न मिळाल्याबाबतचा मोठ्या कारणाचा खुलासा केला होता. युवराज सिंगने सांगितले होते की ग्रेग चॅपेल वादात सचिन तेंडुलकरची साथ दिल्याने त्याला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळू शकले नव्हते. बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांना युवराजचे हे म्हणणे पटले नव्हते. याशिवाय त्याला उप कर्णधारपदही सोडावे लागले होते.
युवराज सिंहने म्हटले होते की मला कर्णधार बनायचे होते. मात्र त्यानंतर ग्रेग चॅपेल आणि सचिन तेंडुलकर यांच्यात वाद झाला यात मी सचिनची साथ दिली. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना ही बाब पटली नाही. मी असेही ऐकले होते की ते इतर कोणालाही कर्णधार बनवण्यास तयार आहेत मात्र मला नाही.
युवराज सिंगने सांगितले की २००७ इंग्लंड दौऱ्यावर वीरेंद्र सेहवागसारखे वरिष्ठ खेळाडू संघात नव्हते. मी त्या दरम्यान वनडे संघाचा उप कर्णधार होतो आणि राहुल द्रविड कर्णधार होता. वनडे संघाचा उपकर्णधार असल्याच्या नात्याने मला वाटले होते की मी कर्णधार बनणार आहे मात्र अचानक मला उप कर्णधारपदावरून हटवण्यात आले. २००७ टी-२० वर्ल्डकपसाठी अचानक महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्यात आले.
अधिक वाचा - तुमचा IQ असेल ग्रेट तर डोकं न खाजवता शोधा तिसरा प्राणी
युवराज सिंहने पुढे सांगितले की भले हा निर्णय माझ्याविरोधात गेला मात्र मला याचे दु:ख नाही. आजही जर अशी परिस्थिती असती तर मी संघाच्या वरिष्ठ खेळाडूचीच साथ दिली असती. युवराज सिंह भले कर्णधार बनू शकला नाही मात्र टीम इंडियाला २००७ चा टी-२० वर्ल्डकप आणि २०११चा वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.