Yuvraj Singh: युवराज सिंगने मैदानात ठोकले चौकार, षटकार, पाहा VIDEO

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 16, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuvraj singh video: माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंहने आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो सराव करताना दिसत आहे. युवराजचा हा व्हिडिओ समोर येताच लोक असे म्हणतायक की तो कोणत्या स्पर्धेद्वारे मैदानात उतरणार आहे.

yuvraj singh
युवराज सिंगने मैदानात ठोकले चौकार, षटकार, पाहा VIDEO 
थोडं पण कामाचं
  • युवराजचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी युवराज लवकरच कोणत्यातरी स्पर्धेतून मैदानात उतरणार आहे अशी शक्यता व्यक्त केली आहे.
  • दरम्यान, ४० वर्षीय ऑलराऊंडरने याचा खुलासा केलेला नाही की तो कोणत्या स्पर्धेची तयारी करत आहे.
  • सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत तो आपल्या जुन्या फॉर्मनुसार फलंदाजी करताना दिसत आहे. 

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर स्टार युवराज सिंहला(yuvraj singh) मैदानात फलंदाजी करताना पाहणे नेहमीच चाहत्यांसाठी आनंद देणारे  ठरले आहे. भारतीय दिग्गजाने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला(international cricket) बाय बाय म्हटले होते. मात्र जेव्हा तो मैदानात उतरत असे तेव्हा चाहते त्याची विस्फोटक खेळी पाहण्यासाठी तरसत असतं. माजी स्टार ऑलराऊंडरने स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात हा स्टार सराव करताना दिसत आहे.Yuvraj singh hits fours and sixes, see video

अधिक वाचा - Milk Price Hike: Amul आणि Mother Dairy ने वाढवले ​​दुधाचे दर

युवराजचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी युवराज लवकरच कोणत्यातरी स्पर्धेतून मैदानात उतरणार आहे अशी शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, ४० वर्षीय ऑलराऊंडरने याचा खुलासा केलेला नाही की तो कोणत्या स्पर्धेची तयारी करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत तो आपल्या जुन्या फॉर्मनुसार फलंदाजी करताना दिसत आहे. 

युवराज सिंहने या दरम्यान रिव्हर्स स्वीप करत चौकारही ठोकले. युवराजचा हा शॉट पाहून तेथील लोक हैराण झाले. सराव सत्रात युवराजचा हा आक्रमक अंदाज पाहून माजी क्रिकेटरही हैराण झाले. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने कमेंट करत विचारले की अखेर प्लान काय आहे. इतकंच नव्हे तर सध्याचा खेळाडू शिखर धवनने यावर प्रतिक्रिया देत कमेंट लिहिली की, क्लास या स्थायी असतो. याशिवाय सूर्यकुमार यादवने इमोजी शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली. याशिवाय त्याचा मित्र हरभजन सिंहने कमेंट करत आपले विचार व्यक्त केले. 

अधिक वाचा - मुलीच्या जन्माच्या ४ महिन्यांतच पुन्हा आई होणार ही अभिनेत्री

माजी भारतीय ऑलराऊंडरने आपला हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की मी इतका वाईट खेळ केला नाही? जे होत आहे त्याच्यासाठी खूप उत्साही आहे. युवराजने तबल्ल ४०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान त्याने ३९१ डावादरम्यान ११७८८ धावा केल्या. इतकंच नव्हे तर त्याने २२७ डावांमध्ये १४८ विकेटही मिळवल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी