सिक्सर किंग युवराजच्या निवृत्तीवर दुःखी आहे पाकिस्तान

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 19:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuvraj singh: टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंगनं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. यानंतर भारतातच नाहीत तर शेजारचा देश पाकिस्तानमधले काही फॅन्सनी युवीच्या निवृत्तीवर दुःख व्यक्त करत त्याला शुभेच्छा देखील दिल्यात.

Yuvraj Singh
सिक्सर किंग युवराजच्या निवृत्तीवर दुःखी आहे पाकिस्तान   |  फोटो सौजन्य: Instagram

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगनं सोमवारी क्रिकेट फॅन्सना झटका दिला. १८ वर्षांच्या करिअरनंतर युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवीच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट फॅन्सना झटका बसला. युवीचे केवळ भारतातच चाहते नसून भारता बाहेरही बरेच चाहते आहे. युवराजचे आपल्या निवृत्ती घोषणा केल्यानंतर केवळ भारतच नाही तर शेजारचा देश पाकिस्तानमध्ये ही त्याचे चाहते दुःखी झाले आहेत. पाकिस्तानी फॅन्सनी सोशल मीडियावर आपल्या हिरोसाठी भावूक संदेश दिला आहे. तसंच युवराजच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे. 

एक नजर टाकूयात सिक्सर किंगला त्याचे पाकिस्तानी फॅन्सनी कशापद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 

युवराज सिंग आपल्या निवृत्तीची घोषणा करताना खूप भावूक झाला होता. यावेळी युवराजनं आपल्या मित्रांना आणि साथीदार खेळाडूंचे आभार मानले. यावेळी युवराजची पत्नी हेजल कीच आणि आई शबनम सिंह सुद्धा उपस्थित होत्या. युवराजनं आपल्या निवृत्तीच्यावेळी असे काही खुलासे केले. जे कोणालाच माहित नव्हते. युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट याच्यासह आयपीएलमधून ही निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. 

कॅन्सरशी झूंज देत युवराजने २०११चा वर्ल्ड कप खेळला. त्यानंतरच त्याच्या कॅन्सरचे निदान झाले होते. कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन त्यानं पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाय ठेवला होता. पण, त्याची बॅट आधी सारखी तळपली नाही. त्याला टीमधून बाहेर पडावं लागलं. अनेक चढ उतार पाहिलेल्या युवराज सिंगची क्रिकेट कारकीर्द निश्चित अनोखी होती. त्यानं कॅन्सरशी दिलेला लढा खेळाडूंनाच नव्हे तर, सामान्यांनाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेरणा देणारा आहे.

वर्ल्ड कप विजयांचा शिल्पकार

युवराज सिंगला २००७ मधील पहिल्या टी-२० आणि २०११च्या वर्ल्ड कपसाठी ओळखले जाईल. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त होता. दोन्ही स्पर्धांमध्ये तो प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट होता. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध त्यानं सहा बॉलमध्ये सहा सिक्सर मारले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली बहुदा ही एकमेव कामगिरी आहे. ३ ऑक्टोबर २००३मध्ये त्यानं केनियाविरुद्ध पहिली वन-डे खेळली होती. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं ऑक्टोबर २००३मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलं होतं. युवराजनं ३०४ वन-डे मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यात त्यानं ८ हजार ७०१ रन्स केल्या. त्यात १४ शतकं आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, कसोटीमध्ये त्यानं ४० मॅचेसमध्ये १९०० रन्स केल्या आहेत. त्यात ३ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजनं ५८ टी-२०मध्ये १ हजार १७७ रन्स केले होते. त्यात ८ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचा टी-२०मधला बेस्ट स्कोअर ७७ होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सिक्सर किंग युवराजच्या निवृत्तीवर दुःखी आहे पाकिस्तान Description: Yuvraj singh: टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंगनं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. यानंतर भारतातच नाहीत तर शेजारचा देश पाकिस्तानमधले काही फॅन्सनी युवीच्या निवृत्तीवर दुःख व्यक्त करत त्याला शुभेच्छा देखील दिल्यात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola