युवराज सिंग पुन्हा दुखापतग्रस्त, एकही रन न बनवता मैदानाच्याबाहेर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 06, 2019 | 14:14 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ही घटना आठव्या ओव्हरमधली आहे. टोरंटो नॅशनल्सने आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर हेनरिच क्लासेनच्या रुपात तिसरा विकेट गमावला.

Yuvraj Singh
युवराज सिंग 

थोडं पण कामाचं

  • युवराज सिंगला पाठदुखीचा त्रास
  • टोरंटो नॅशनल्सने माँट्रियाल टायगर्सला ४ विकेटनी दिली मात
  • युवराज सिंगने नुकतीच २२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती

ब्रेंप्टन: टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग सध्या कॅनडा ग्लोबल टी-२० मध्ये टोरंटो नॅशनल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. टोरंटो नॅशनल्सचा कर्णधार युवराजने नुकतीच जबरदस्त खेळी करत चाहत्यांचे मनोरंजन केले.  रविवारीही तो याच इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र तो यावेळी आपली जादू दाखवू शकला नाही. युवराज आपली जादू न दाखवता एकही रन न काढता मैदानातून बाहेर गेला. उजव्या हाताचा गोलंदाजाला पाठदुखीमुळे एकही धाव करता आली नाही. तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. 

ही घटना आठव्या ओव्हरमधली आहे. टोरंटो नॅशनल्सने आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर तिसरी विकेट गमावली. तेव्हा त्यांचा स्कोर होता तीन बाद ७३. क्लासेन बाद झाल्यानंतर कर्णधार युवराज सिंग फलंदाजीसाठी उतरला. फवाद अहमदच्या पहिल्या चेंडूवर युवराज सिंगने एकही धाव घेतली नाही. पुढच्या बॉलवर युवराज सिंगने स्वीप शॉट खेळला. मात्र तेव्हा त्याचा पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. युवीला हा त्रास सहन झाला नाही. त्याने डगआऊट होण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, युवराजच्या टीमने शानदार प्रदर्शन केले आणि त्यांनी माँट्रियाला टायगर्सला १५ चेंडू राखत चार विकेटनी मात दिली. माँट्रियाल टायगर्सने निर्धारित २० ओव्हरमध्ये ९ बाद १३६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टोरंटो नॅशनल्सने १७.३ ओव्हरमध्ये ६ विकेट गमावत लक्ष्य पूर्ण केले. टोरँटोच्या विजयाचा शिल्पकार ठरला चिराग सुरी त्याने ३७ चेंडूत सात चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. टोरंटो नॅशनल्सचा पाचव्या सामन्यातील दुसरा विजय आहे. मात्र सेमीफायनलमध्ये त्यांचा पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. 

युवराजने नुकत्याच ब्रेंप्टन व्होल्व्सविरुद्ध आक्रमक खेळी केली होती. त्याने केवळ २२ चेंडूत २३१.८१ च्या स्ट्राईक रेटने ५१ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ५ षटकार ठोकले. 

युवराजने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराजच्या नावावर अनेक अविस्मरणीय खेळी आहेत. त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये लगावलेले ते सहा सिक्सर आजही प्रेक्षकांच्या मनात तसेच कोरले गेलेले आहेत. त्याने अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय.  तसेच पुढेही क्रिकेटचा आनंद घेत राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळेच तो ग्लोबल टी-२०मध्ये क्रिकेटचा निखळ आनंद घेत आहे. आता क्रिकेट चाहत्यांना युवराजच्या दुखापतीबाबतचे अपडेट हवे आहेत. कर्णधार पुन्हा बरा होऊन कधी खेळू लागेल याची प्रतीक्षा फॅन्स करत आहेत. ज्यामुळे आपल्या फलंदाजीने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी