Yuzvendra Chahal : मस्करी पडली महागात; करायला गेला एक आणि झालं...

IND vs SA: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या मजामस्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे. युजी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकदा मजा करताना दिसला आहे.

Yuzvendra Chahal kicked a South African player, know what happened then
Yuzvendra Chahal : मस्करी पडली महागात; करायला गेला एक आणि झालं...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चहलने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला लाथ मारली
  • ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली.
  • सामना काही काळ थांबवण्यात आला

IND vs SA: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलचा स्वभाव मजामस्ती करण्याचा आहे.  तो अनेकदा खेळांडूंसोबत मैदानावर आणि मैदानाबाहेर मस्ती करताना दिसला आहे. त्यांच्या मस्तीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चहल दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला लाथ मारताना दिसत आहे. (Yuzvendra Chahal kicked a South African player, know what happened then)

अधिक वाचा : Virat Kohli: मैदानावर कोहलीने असे करून जिंकली चाहत्यांची मने

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता, परंतु तरीही त्याने आपल्या मस्तीतून आपल्याकडे लक्ष्य वेधून घेतले. खरं तर, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान फ्लडलाइटमध्ये समस्या निर्माण झाल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला होता. दरम्यान, यूजी चहल पाणी देण्यासाठी मैदानावर आला आणि त्याने ऋषभ पंत, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम यांच्यासोबत उभ्या असलेल्या तबरेज शम्सी लाथ मारली आणि ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली. 

या घटनेनंतर दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य स्पष्टपणे दिसत होते, तर शेजारी उभा असलेला ऋषभ पंतही ते पाहून हसला.

अधिक वाचा : Ind Vs SA 2nd T20: भर सामन्यात अंपायरवर भडकला रोहित

युजवेंद्र चहल आणि तबरेज शम्सी खूप चांगले मित्र आहेत. चहल आणि शम्सी हे दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून एकत्र खेळले आहेत. शम्सी 2016 ते 2018 पर्यंत आरसीबी संघाचा भाग होता. त्याच वेळी, लोक या व्हिडिओवर खूप मजा करत आहेत आणि लिहित आहेत की 'जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला खूप दिवसांनी भेटता'. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने हा 16 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी