विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिला इंटरव्ह्यू, पाहा काय म्हणाला विराट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 12, 2019 | 18:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बीसीसीआय डॉट टीव्हीवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली युझवेंद्र चहलची मुलाखत घेताना दिसत आहे.

chahal and kohli
चहल आणि कोहली 

थोडं पण कामाचं

  • कर्णधार विराट कोहलीने चहलला दिला इंटरव्ह्यू
  • चहलचा कोहलीला शानदार प्रश्न
  • यावेळी चहलने विराटच्या डान्सची केली प्रशंसा

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक व्हिडिओ इंटरव्ह्यू शूट दिले आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत त्याचा सहकारी क्रिकेटर युझवेंद्र चहल दिसत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली चहलला प्रश्न विचारताना दिसत आहे आणि कोहली त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. खुद्द कोहलीने चहल टीव्हीवर आपला साथीदार युझवेंद्र चहलशी ही बाततीच केली. चहलने कोहलीचा एक व्हिडिओ इंटरव्ह्यू शूट केला आहे. हा व्हिडिओ बीसीसीआय डॉट टीव्हीवर पोस्ट करण्यात आला आहे. 

चहलशी बातचीत करताना कोहली म्हणाला, मी मैदानावर भरपूर आनंद घेत आहे. केवळ कर्णधार आहे म्हणून मी कोणत्याही कारणामुळे दबावाखाली राहत नाही. मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आणि याचा मी आनंद घेत आहे. आपल्याला जेव्हा कुठे म्युझिक ऐकू येईल तिथे नाचले पाहिजे. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना या आनंदात सामील करून घेतले पाहिजे. सध्या मी खूप खुश आहे. याच कारणामुळे मी संधी मिळाल्यास नाचण्याची संधी सोडत नाही. 

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत १२० धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. कोहलीने वनडे करिअरमधील आपले ४२वे शतक पूर्ण केले. कोहली पुढे म्हणाला, आमचे नेहमी लक्ष्य राहिले आहे की टॉप ३ मधील कोणीतरी एकाने मोठी धावसंख्या उभारावी. रोहित गेल्या काही सामन्यांपासून चांगली कामगिरी करत आहे. मला जेव्हा संधी मिळाल्या आहे मी धावा केल्या आहेत. दुर्देवाने आज रोहित आणि धवन मोठी खेळी करू शकले नाहीत. याच कारणामुळे मला मैदानावर टिकणे गरजेचे होते. 

तुला कोणती गोष्ट प्रेरणा देते फलंदाजी की फिल्डिंग असे कोहलीला विचारले असता तो म्हणाला, माझे सरळ माइंडसेट अशते. मला माझ्या संघासाठी १०० टक्के द्यायचे असते. फलंदाजी असो वा फिल्डिंग वा कॅच अथवा रन आऊट. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करतो. मी यासाठी नेहमी अनुशासित जीवनशैली जदतो. जर मी माझे १०० टक्के देत नाही आहे तर मी माझ्या संघाला योग्य न्याय देत नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिला इंटरव्ह्यू, पाहा काय म्हणाला विराट Description: बीसीसीआय डॉट टीव्हीवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली युझवेंद्र चहलची मुलाखत घेताना दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...