चहलची पत्नी धनश्रीने आधी आडनाव हटवले आणि आता म्हणाली असं काही की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 18, 2022 | 17:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal:  युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माच्या एका पोस्टमध्ये त्रास झाल्याचे संकेत दिले आहेत. नुकतेच तिने आपल्या नावामागचे चहल हे आडनाव हटवले होते. 

yuzvendra chahal and dhanashree verma
आडनाव हटवल्यानंतर चहलची पत्नी असं काही म्हणाली की.... 
थोडं पण कामाचं
  • युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची जोडी सगळ्यात सुपरहिट जोड्यांपैकी एक मानली जाते.
  • मात्र सध्या असा संशय व्यक्त केला जात आहे की या जोडीमध्ये काही आलबेल सुरू नाही आहे.
  • धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहल हे आडनाव हटवल्यानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मुंबई: टीम इंडियाचा जबरदस्त स्पिनर युझवेंद्र चहलच्या(yuzvendra chahal) आयुष्यात सध्या आलबेल असल्याचे दिसत नाही आहे. तो आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा(dhanashree verma) सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या जोडीला चाहत्यांची मोठी पसंतीही मिळते. मात्र ही जोडी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे . खरंतर धनश्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहल हे नाव हटवले. हे पाहून असे म्हटले जात आहे की या जोडप्यादरम्यान काही आलबेल नाही आहे. यात आता धनश्री वर्माने केलेल्या आणखी एका इन्स्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. यावेळेस तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की त्यावरून अंदाज लावता येऊ शकतो की दोघांमध्ये काही नीट चाललेले नाही. Yuzvendra chahal wife dhanashree verma new post on instagram

अधिक वाचा - बोटीवर AK-47 कुठून आले?, फडणवीस काहीच बोलले नाही!

धनश्री वर्माची पोस्ट

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची जोडी सगळ्यात सुपरहिट जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र सध्या असा संशय व्यक्त केला जात आहे की या जोडीमध्ये काही आलबेल सुरू नाही आहे. धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहल हे आडनाव हटवल्यानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने आपले दोन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, एक राजकुमार नेहमी आपले दु:ख शक्तीमध्ये बदलेल. या पोस्टवरून तिला त्रास झाल्याचे समजतेय. 

चहलनेही केली होती विचित्र पोस्ट

धनश्री वर्माने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम युजरनेमवरून चहल हे आडनाव हटवले होते. याआधी इन्स्टाग्रामवर तिचे युझरने धनश्री वर्मा चहल असे होते. यानंतर युझवेंद्र चहलच्याही एका इन्स्टाग्राम पोस्टने सवाल उपस्थित केले होते. यात त्याने लिहिले होते की नवीन आयुष्य सुरू होत आहे. दरम्यान, धनश्रीने आपल्या अकाऊंटवरून अद्याप युझवेंद्रसह फोटो शेअर केलेला नाही. 

अधिक वाचा - मोबाइलवर असा सेट करा भगवान श्रीकृष्णाचा वॉलपेपर

२०२०मध्ये झाले होते लग्न

युझवेंद्र चहल आणि् त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी ३ महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ऑगस्ट २०२०मध्ये साखरपुडा केला होता. २२ डिसेंबर २०२०मध्ये लग्नबंधनात अडकले होते. धनश्री वर्मा एक डान्स कोरिओग्राफर आणि डेंटिस्टही आहे.  धनश्री वर्मा डान्स कोरिओग्राफर आणि एक डेंटिस्टही आहे. धनश्री वर्माचे डान्सशी संबंधित एक यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर २६ लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनश्री बॉलिवूड गाण्यांना रिक्रिएट करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी