6,6,6,6,4,6: झिम्बाब्वेचा हा फलंदाज बनला युवराज, एका ओव्हरमध्ये ठोकल्या ३४ धावा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 04, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

झिम्बाब्वेच्या रेयान बर्लने एका ओव्हरमध्ये तब्बल ३४ धावा ठोकल्या आहेत. त्याने ही खेळी बांगलादेशविरुद्ध केली.

zimbawbe batsman
6,6,6,6,4,6: झिम्बाब्वेचा हा फलंदाज बनला युवराज 
थोडं पण कामाचं
  • झिम्बाब्वेसाठी १५वी ओव्हर शानदार राहिली यात रेयानने बांगलादेशचा गोलंदाज नसुम अहमदविरोधात ५ सिक्स आणि एक फोर ठोकत एकूण ३४ धावा बनवल्या.
  • यासोबतच रेयानने टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
  • डावखुरा स्पिनर नसुम अहमद टी-२०मध्ये चौथी सगळ्यात महागडी ओव्हर फेकणारा गोलंदाज ठरला.

मुंबई: हरारेमध्ये(harare) खेळवण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात झिम्बाब्वेने(zimbawbe) बांगलादेशला(bangladesh) १० धावांनी हरवले. यासोबतच झिम्बाब्वेने ही मालिका २-१ अशी आपल्या नावे केली आहे. या सामन्यात एक जबरदस्त रेकॉर्ड झाला. झिम्बाब्वेच्या रेयान बर्लने तुफानी खेळी करताना झिम्बाब्वेला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (Zimbabwe batsman ryan barl hits 5 sixes )

अधिक वाचा - सोन्याच्या भावात अस्थिरता, चढउतार सुरूच...पाहा ताजा भाव

रेयानची तुफानी खेळी

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेने रेयान बर्लच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावत १५८ धावांचा स्कोर उभा केला. याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावताना १४६ धावा केल्या. या सामन्यात झिम्बाब्वेच्या रेयान बर्लने केवळ २८ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने जबरदस्त ५४ धावांची खेळी केली. 

एका ओव्हरमध्ये केल्या ३४ धावा

झिम्बाब्वेसाठी १५वी ओव्हर शानदार राहिली यात रेयानने बांगलादेशचा गोलंदाज नसुम अहमदविरोधात ५ सिक्स आणि एक फोर ठोकत एकूण ३४ धावा बनवल्या. यासोबतच रेयानने टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. तर डावखुरा स्पिनर नसुम अहमद टी-२०मध्ये चौथी सगळ्यात महागडी ओव्हर फेकणारा गोलंदाज ठरला. जर रेयानने ५व्या बॉलवर चौकाराच्या जागी षटकार ठोकला असता तर टी-२० क्रिकेटमध्ये सलग ६ सिक्स ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला असता. 

तिसरी सगळ्यात महागडी ओव्हर

टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने २००७मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एका ओव्हरमध्ये सलग ६ सिक्स ठोकत एकूण ३६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर किरेन पोलार्ड आहे ज्याने २०२१मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयच्या एका ओव्हरमध्ये सलग ६ गगनचुंबी सिक्स ठोकले होते. 

अधिक वाचा - धनुष्यबाणाबाबत निकालापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका: कोर्ट

टी-२०मध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा

३६ - युवराज सिंह
३६ - किरेन पोलार्ड
३४ - रेयान बर्ल
३२ - जोस बटलर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी