LIVE BLOG
More UpdatesMore Updates

T20 World Cup, IN vs BAN: अटीतटीच्या सामन्यात भारताचा बांगलादेशवर अवघ्या 5 रनने विजय

INDIA vs BANGLADESH, IN vs BAN T20 World Cup 2022 Score Streaming: टी-20 विश्वचषकात भारत वि. बांगलादेश सामना आज रंगणार आहे. टीम इंडियाने सुरुवातीला पहिले दोन सामने जिंकून विश्वचषकाची आपली सुरुवात चांगली केली. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.

भारत वि. बांगलादेश टी-20 सामना
फोटो सौजन्य:  Twitter
भारत वि. बांगलादेश टी-20 सामना

India VS BANGLADESH, IN vs BAN T20 World Cup 2022 Score Streaming: मेलबर्न: टी-20 विश्वचषकात भारत आज (2 ऑक्टोबर) बांगलादेशशी भिडणार आहे. यावेळी बांगलादेशला पराभूत करुन टीम इंडिया विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यासाठी आपलं स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे बांगलादेश देखील या सामन्यात विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करुन शकतं.


मात्र, असं असलं तरीही या सामन्यावर पावसाचं सावट देखील आहे. त्यामुळे जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर ग्रुपमधील संपूर्ण गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच हा सामना ठरल्याप्रमाणेच व्हावा अशी इच्छा दोन्ही संघ आणि लाखो क्रिकेट शौकीन देखील करत आहेत. 

पाहा भारत वि. बांगलादेश टी-20 सामना: LIVE Score Card:


 

Nov 02, 2022  |  05:49 PM (IST)
अटीतटीच्या सामन्यात भारताचा बांगलादेशवर 5 रनने विजय

अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय. या विजयामुळे भारताने टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलसाठी केलं आपलं स्थान भक्कम

Nov 02, 2022  |  05:46 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 7 धावांची गरज

चौकार... बांगलादेशला विजयासाठी 1 चेंडूत 7 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:45 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 2 चेंडूत 11 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:44 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 13 धावांची गरज

षटकार... बांगलादेशला आता 3 चेंडूत 13 धावा हव्यात

Nov 02, 2022  |  05:43 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 13 धावांची गरज

षटकार... बांगलादेशला आता 4 चेंडूत 13 धावा हव्यात

Nov 02, 2022  |  05:41 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 19 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 5 चेंडूत 19 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:41 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 20 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 6 चेंडूत 20 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:38 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 20 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 7 चेंडूत 20 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:36 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 21 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 9 चेंडूत 21 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:32 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 31 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:30 PM (IST)
बांगलादेशला विजयासाठी 36 धावांची गरज

बांगलादेशला विजयासाठी 15 चेंडूत 36 धावांची गरज

Nov 02, 2022  |  05:27 PM (IST)
T20 World Cup, IN vs BAN: बारावी ओव्हर 

बांगलादेशच्या 13 ओव्हरमध्ये 108 धावा, 6 विकेट

Nov 02, 2022  |  05:26 PM (IST)
हार्दिक पांड्याची जबरदस्त गोलंदाजी

हार्दिकनेही घेतल्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट, मोसद्दक हौसेनही बाद

Nov 02, 2022  |  05:24 PM (IST)
धडाकेबाज फलंदाज यासिर अली बाद

बांगलादेशला पाचवा धक्का, धडाकेबाज फलंदाज यासिर अली 1 रनवर बाद

Nov 02, 2022  |  05:21 PM (IST)
T20 World Cup, IN vs BAN: बारावी ओव्हर

बांगलादेशच्या 12 ओव्हरमध्ये 102 धावा, 4 विकेट

Nov 02, 2022  |  05:19 PM (IST)
अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट

अर्शदीपने केली कमाल, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट.. कर्णधार शाकिब अल हसन 13 रन करुन बाद

Nov 02, 2022  |  05:14 PM (IST)
बांगलादेशला बसला तिसरा झटका

बांगलादेशचा तिसरा गाडी बाद, अर्शदीपने मोक्याच्या क्षणी घेतली विकेट

Nov 02, 2022  |  05:12 PM (IST)
T20 World Cup, IN vs BAN: अकरावी ओव्हर 

बांगलादेशच्या 11 ओव्हरमध्ये 99 धावा, 2 विकेट

Nov 02, 2022  |  05:11 PM (IST)
T20 World Cup, IN vs BAN: दहावी ओव्हर

बांगलादेशच्या 10 ओव्हरमध्ये 88 धावा, 2 विकेट

Nov 02, 2022  |  05:07 PM (IST)
बांगलादेशला दुसरा झटका, दुसरा सलामीवीरही बाद

लिटन दास पाठोपाठ शान्तो देखील बाद, मोहम्मद शमीने घेतली विकेट