LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Ind Vs SA Live Score Update । LIVE क्रिकेट स्कोअर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय : द. आफ्रिकेने वन डे सीरिज जिंकली

IND vs SA 2nd ODI Live Score, India vs South Africa ODI Live Cricket Score Streaming Online (India-South Africa ODI Match Live Cricket Score): भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज पार्ल येथे झाला. हा सामना जिंकून द. आफ्रिकेने मालिका २-० अशी सहज खिशात टाकली.

IND vs SA 2nd ODI Live Score,
फोटो सौजन्य:  Times Now
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय Live Updates

IND vs SA 2nd ODI Live Score, India vs South Africa ODI Live Cricket Score: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज पार्ल येथे झाला. हा सामना जिंकून द. आफ्रिकेने मालिका २-० अशी सहज खिशात टाकली.

दोन्ही देशांचे संभाव्य 11 

भारताचे संभाव्य प्लेइंग 11 - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेइंग  11 - क्विंटन डी कॉक, जानेमन मालन, टेम्बा बवुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, एंडिल फेहलुकवायो, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि तबरेझ शम्सी.

Jan 21, 2022  |  10:28 PM (IST)
द. आफ्रिकेचा ७ विकेट राखून विजय

द. आफ्रिकेचा ७ विकेट राखून विजय
द. आफ्रिका - ४८.१ ओव्हरमध्ये ३ बाद २८८ धावा
भारत - ५० ओव्हरमध्ये ६ बाद २८७ धावा
भारत - नाणेफक जिंकून फलंदाजीचा निर्णय

द. आफ्रिकेची फलंदाजी - 

जनमन मालन - ९१ धावा
क्विंटन डी. कॉक - ७८ धावा
टेम्बा बावुमा (कर्णधार) - ३५ धावा
एडेन मार्कराम- नाबाद ३७ धावा
रस्सी वैन डेर डूसन - नाबाद ३७ धावा

भारताची गोलंदाजी - जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल - प्रत्येकी एक विकेट

भारताची फलंदाजी - 

के. एल. राहुल (कर्णधार) - ५५ धावा
शिखर धवन - २९ धावा
विराट कोहली - शून्य धावा
रिषभ पंत - ८५ धावा
श्रेयस अय्यर - ११ धावा
वेंकटेश अय्यर - २२ धावा
शार्दुल ठाकुर - नाबाद ४० धावा
आर. अश्विन - नाबाद २५ धावा

द. आफ्रिकेची गोलंदाजी - सिसांडा मगला, एडेन मार्कराम, केशव महाराज, एंडिले फेहलुकवायो - प्रत्येकी एक विकेट तर तबरेझ शम्सी - दोन विकेट

Jan 21, 2022  |  10:17 PM (IST)
द. आफ्रिकेने भारताविरुद्धची वन डे सीरिज २-० ने जिंकली

भारताविरुद्धच्या तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिल्या दोन मॅच जिंकून द. आफ्रिकेने वन डे सीरिज २-० अशी जिंकली

Jan 21, 2022  |  09:26 PM (IST)
द. आफ्रिका ३९ ओव्हरमध्ये ३ बाद २३७ धावा

भारताने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या द. आफ्रिकेने ३९ ओव्हरमध्ये ३ बाद २३७ धावा केल्या.

द. आफ्रिका ३९ ओव्हरमध्ये ३ बाद २३७ धावा
जनमन मालन - ९१ धावा
क्विंटन डी कॉक - ७८ धावा
टेम्बा बावुमा (कर्णधार) - ३५ धावा
एडेन मार्कराम -  नाबाद ९ धावा
रस्सी वैन डेर डूसन - नाबाद १६ धावा

जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल - प्रत्येकी एक विकेट

Jan 21, 2022  |  07:02 PM (IST)
आफ्रिकेचे जलद अर्धशतक

द. आफ्रिकने भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना ८ व्या षटकात ५२ धावा केल्या आहेत. सर्व गोलंदाजी धुलाई सलामीवीरांनी करण्याचे काम सुरू आहे. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: दक्षिण अफ्रिका 52/0, 8 ओवर( लक्ष्य 288 रन)

Jan 21, 2022  |  06:45 PM (IST)
Ind Vs SA 2nd ODI Live Score: क्विंटन डिकॉकची जोरदार फटकेबाजी

भारताच्या २८७ धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन षटकात  क्विटन डी कॉक जबरदस्त फलंदाजी करत असून त्याने ३ षटकात २८ धावा कुटल्या आहेत. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: दक्षिण अफ्रिका 28/0, 3 ओव्हर ( लक्ष्य 288 धावा)

Jan 21, 2022  |  06:01 PM (IST)
India Vs South Africa 2nd One day Score: भारताचे आफ्रिकेसमोर २८८ धावांचे आव्हान

भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात ऋषभ पंत (85) आणि के एल राहुल (55) यांनी शानदार खेळी आणि शार्दुलच्या शानदार ४० धावांमुळे भारताने निर्धारीत ५० षटकात २८७ धावा केल्या. 

Jan 21, 2022  |  05:55 PM (IST)
अश्विनचा जबरदस्त फटका

रविचंद्रन अश्विनने डावाच्या 46व्या षटकातील चौथ्या चेंडूवर केशव महाराजच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर षटकार ठोकला. या षटकात 11 धावा झाल्या. 47 षटकांनंतर भारताची धावसंख्या 263/6. शार्दुल ठाकूर 32* आणि रविचंद्रन अश्विन 11* खेळत आहेत.

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 263/6, 47 ओव्हर 

Jan 21, 2022  |  05:33 PM (IST)
डिकॉकची पुन्हा शानदार स्टंपिंग, वेंकटेश अय्यर २२ धावांवर बाद

गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही अॅक्शन रिप्ले पहायला मिळाला. वेंकटेश अय्यरला काही कळण्याच्या आत क्विंटन डिकॉकने स्टंपिंग करत बाद केले. यावेळही गोलंदाज फेहलुकवायो होता. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 239/6, 44 ओव्हर 

Jan 21, 2022  |  04:58 PM (IST)
India Vs SA Live Score Update: शम्सीचा भारताला दुसरा झटका, श्रेयस अय्यर बाद

तबरेज शम्सी  याने भारताला दुसरा झटका दिला आहे. यापूर्वी पंतला बाद केल्यानंतर श्रेयस अय्यला पायचित बाद केले. वन डे सिरीजमधील पहिला रिव्ह्यू घेण्यात आला. तो यशस्वी झाला. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 207/5, 37 ओव्हर 

Jan 21, 2022  |  04:38 PM (IST)
Ind Vs SA 2nd ODI Live Score: शम्सीचा भारताला मोठा धक्का, पंत ८५ धावांवर बाद

शतकाच्या उंबरठ्यावर असताना पुन्हा एकदा बेजबाबदार फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत बाद झाला आहे. त्याने ८५ धावा केल्या. तबरेज शम्सीने त्याला बाद केले. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 186/4, 33 ओव्हर 

Jan 21, 2022  |  04:31 PM (IST)
भारतला तिसरा झटका, कर्णधार के एल राहुल बाद

दक्षिण आफ्रिकन संघात सामील झालेल्या मगाला याने भारताचा कर्णधार के एल राहुल याला ३२ व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलने ५५ धावांची संयमी खेळी केली.

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 183/3, 32ओवर 

Jan 21, 2022  |  04:13 PM (IST)
India Vs South Africa 2nd One day Score: के एल राहुलने साजरे केले १० वे अर्धशतक

भारताचा नवा वन डे कर्णधार याने आपल्या कारकिर्दीतील १० वे अर्धशतक साजरे केले. यासाठी त्याने ७४ चेंडुंचा सामना केला, त्यात ४ चौकारांचा समावेश आहे. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 167/2, 29 ओव्हर 

Jan 21, 2022  |  04:04 PM (IST)
Ind Vs SA Live Score: भारताच्या १५० धावा पूर्ण

ऋषभ पंत आणि के एल राहुल यांच्या शानदान फलंदाजीच्या जोरावर भारताने २७ षटकात १५० धावांचा पल्ला गाठला आहे. या दरम्यान शिखर आणि विराट बाद झाल्यावर भारताचा डाव डळमळीत झाला होता. पण पंत आणि राहुलच्या भागिदारीने डावाला आकार आला. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 150/2, 27 ओव्हर

Jan 21, 2022  |  03:42 PM (IST)
India Vs South Africa 2nd One day Score: मारक्रमकडून शानदार षटक

एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेसाठी डावातील 22 वे षटक चांगले केले, परंतु पंतने शेवटच्या चेंडूवर चौकार मारण्यात यश मिळविले. मार्करामने शेवटचा चेंडू लेग साइडमध्ये टाकला, त्यावर पंतने सुरेख शॉट मारला आणि चार धावा केल्या. या षटकात चार धावा झाल्या. 22 षटकांनंतर भारताची धावसंख्या 115/2. ऋषभ पंत 34* आणि केएल राहुल 41* खेळत आहेत.

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 115/2, 22 ओव्हर

Jan 21, 2022  |  03:32 PM (IST)
Ind Vs SA 1st ODI Live Score: भारतीय संघ पुनरागमन करत आहे

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी चौकार लगावून भारतीय संघाला पुनरागमन केले आहे. महाराजांच्या षटकात पंत आणि राहुलने 9 धावा दिल्या. १९ षटकांनंतर भारताची धावसंख्या ९९/२. केएल राहुल 39* आणि ऋषभ पंत 20* धावांवर खेळत आहे.\

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 99/2, 19 ओव्हर

Jan 21, 2022  |  03:14 PM (IST)
India Vs SA Live Score Update: के एल राहुल याला १५ व्या षटकात मोठे जीवनदान

१५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडुवर रिषभ पंत आणि के एल राहुल यांच्यात गैरसमज झाला आणि दोन्ही एकाच बाजूला धावून आले. परंतु टेम्बा बवुमा यांचा थ्रो केशव महाराजकडे आला नाही. त्यामुळे के एल राहुल याला मोठे जीवनदान मिळाले. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 70/2, 15 ओव्हर

Jan 21, 2022  |  03:08 PM (IST)
Ind Vs SA Live Score: केशव महाराजने दिला भारताला दुसरा धक्का, विराट शुन्यावर बाद

दुसऱ्या वन डेमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या पदरी निराशा आली आहे. त्याने केवळ पाच चेंडू खेळून शून्यावर बाद झाला आहे. केशव महाराज याने कर्णधार टेम्बा बवुमाकरवी झेल बाद केला. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 63/2, 13 ओव्हर

Jan 21, 2022  |  02:58 PM (IST)
India Vs South Africa 2nd One day Score: मारक्रमने दिला भारताला पुन्हा पहिला धक्का, शिखऱ बाद

भारतीय सलामीवीर फलंदाजांना बाद करण्याचा मारक्रम प्रघात सुरू आहे. यावेळी त्याने सलामीवीर शिखर धवनला २९ धावांवर बाद केले. 

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 63/1, 12 ओव्हर

Jan 21, 2022  |  03:06 PM (IST)
India Vs SA Live Score Update: मारक्रमकडून उत्कृष्ट षटक

एडन  मारक्रमने भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही आणि सलग दुसरे किफायतशीर षटक टाकले. मार्करामच्या षटकात फक्त 2 धावा आल्या. यासह पॉवरप्ले संपतो. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या 57/0. शिखर धवन २५* आणि केएल राहुल २१* खेळत आहे.

Jan 21, 2022  |  02:53 PM (IST)
India Vs South Africa ODI Live: राहुलचा शानदार शॉट

लुंगी एनगिडीने त्याच्या स्पेलचे पाचवे षटक टाकले. दुसऱ्या चेंडूवर राहुल पुढे आला आणि त्याने ड्राईव्ह खेळला. दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण जरा संथ दिसत होते, पण हा फटका बघायला मजा आली. या षटकात 6 धावा झाल्या. 9 षटकांनंतर भारताची धावसंख्या 55/0. शिखर धवन २४* आणि केएल राहुल २०* खेळत आहे.

IND vs SA, 2nd Odi Live Score: भारत 55/0, 9 ओव्हर