LIVE BLOG
More UpdatesMore Updates

IPL Auction 2023 LIVE updates: सॅम करन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर

IPL 2023 Auction updates: आयपीएलच्या आगामी सीझनसाठी प्लेअर्सचा मिनी लिलाव होत आहे. या लिलावात 405 प्लेअर्सचा लिलाव होत आहे. जाणून घ्या या लिलावाचे सर्व LIVE UPDATES

IPL Auction 2023 LIVE updates (Photo Credit: BCCI / IPL)
IPL Auction 2023 LIVE updates (Photo Credit: BCCI / IPL)

IPL Auction 2023 live Updates: इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल 2023 साठी प्लेअर्सचा लिलाव सुरू झाला आहे. यावेळी मिनी ऑक्शन होणार असून यामध्ये 405 प्लेअर्सचा लिलाव होत आहे. यापैकी 273 भारतीय प्लेअर्स तर 132 परदेशी प्लेअर्स आहेत. इंग्लंडचा ऑलराऊंडर प्लेअर सॅम करन हा आयपीएल लिलावात सर्वात महाग प्लेअर ठरला आहे. त्याने युवराज सिंग आणि क्रिस मॉरिस यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. सॅम करनला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. सॅम करन याची बेस प्राईस 2 कोटी रुपये इतकी होती. (Sam Curran most expensive player ever to be bought in IPL. Sam Curran sold to Punjab Kings for 18.50 Crore)

IPL Auction 2023 LIVE Updates वाचा सविस्तर...

Dec 23, 2022  |  04:44 PM (IST)
IPL Auction 2023 Nicholas Pooran Sold: निकोलस पूरन याला लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने खरेदी केलं
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याला लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने खरेदी केलं आहे. निकोलस पूरन याला 16 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.
Dec 23, 2022  |  03:56 PM (IST)
IPL Auction 2nd Set: दुसरा सेट (कॅप्ड ऑलराऊंडर)

शाकिब अल हसन - अनसोल्ड 
सॅम करन - 18.50 कोटी रुपये - पंजाब किंग्ज
ओडियन स्मिथ - 50 लाख रुपये - गुजरात टायटन्स
सिकंदर रजा - 50 लाख रुपये - पंजाब किंग्ज
जेसन होल्डर - 5.75 कोटी रुपये - राजस्थान रॉयल्स
कॅमरन ग्रीन - 17.50 कोटी रुपये - मुंबई इंडियन्स
बेन स्टोक्स - 16.25 कोटी रुपये - चेन्नई सुपर किंग्ज

Dec 23, 2022  |  03:47 PM (IST)
IPL Auction 2023 Ben Stokes sold to CSK: बेन स्टोक्स याला सीएसके टीमने केलं खरेदी 

इंग्लंडचा ऑलराऊंडर प्लेअर बेन स्टोक्स याला चेन्नई सुपरकिंग्जच्या टीमने खरेदी केलं आहे. बेन स्टोक्स याला 16.25 कोटी रुपयांत खरेदी केलं. (Ben Stokes sold to CSK for 16.25 Crore)

Dec 23, 2022  |  03:46 PM (IST)
IPL Auction 2023 Cameron Green sold: कॅमरून ग्रीन याला मुंबई इंडियन्सने केलं खरेदी

कॅमरून ग्रीन याला मुंबई इंडियन्सच्या टीमने 17.50 कोटी रुपयांत खरेदी केलं. (Cameron Green Sold to Mumbai Indians Team for 17.5 crore)

Dec 23, 2022  |  03:39 PM (IST)
IPL Auction 2023 Jason Holder sold : जेसन होल्डर याला राजस्थान रॉयलन्सने केलं खरेदी

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर जेसन होल्डर याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नईने आधी बोली लावली मात्र, राजस्थानच्या टीमने 5.75 कोटी रुपयांच्या सर्वात मोठी बोली लावून जेसनला खरेदी केलं. 

Dec 23, 2022  |  03:34 PM (IST)
IPL Auction 2023 Odean Smith and Sikandar Raza: ओडियन स्मिथ आणि सिकंदर रजा सोल्ड

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर ओडियन स्मिथ याला गुजरात टायटन्स टीमने 50 लाख रुपयांत खरेदी केलं. त्याची बेस प्राईस 50 लाख रुपयेच होती. तर सिकंदर रजा याला पंजाब किंग्सने 50 लाख रुपयांत खरेदी केलं. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा याची बेस प्राईस 50 लाख रुपये होती. 

Dec 23, 2022  |  03:32 PM (IST)
Sam Curran sold with highest bid: आयपीएल इतिहासात सर्वात महागडा प्लेअर

इंग्लंडचा ऑलराऊंडर प्लेअर सॅम करन हा आयपीएल लिलावात सर्वात महाग प्लेअर ठरला आहे. त्याने युवराज सिंग आणि क्रिस मॉरिस यांचाही रेकॉर्ड तोडला आहे. सॅम करनला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. सॅम करन याची बेस प्राईस 2 कोटी रुपये इतकी होती. (Sam Curran becomes most expensive player in IPL)

Dec 23, 2022  |  03:26 PM (IST)
IPL Auction 2023 Sam Curran sold : सॅम करनला 18.50 कोटी रुपयांना केलं खरेदी

Sam Curran sold: आयपीएल 2023 च्या लिलावात सॅम करन याला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केलं.

Dec 23, 2022  |  03:15 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: शाकिब अल हसन अनसोल्ड

ऑलराऊंडर प्लेअर शाकिब अल हसन याला कोणत्याही टीमने खरेदी केलं नाही. 

Dec 23, 2022  |  03:19 PM (IST)
IPL Auction Live Update sold player: रायली रूसो अनसोल्ड
दक्षिण आफ्रिकेचा रायली रूसो यालाही कोणत्याही टीमने खरेदी केलं नाही.
Dec 23, 2022  |  03:04 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: इंग्लंडचा स्टार प्लेअर जो रूट Unsold

इंग्लंडचा स्टार प्लेअर जो रूट याला कोणत्याही टीमने खरेदी केलं नाही.

Dec 23, 2022  |  03:03 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपरकिंग्जने केलं खरेदी

अजिंक्य रहाणे याला चेन्नई सुपरकिंग्जच्या टीमने बेस प्राईसवर म्हणजेच 50 लाखांत खरेदी केलं.

Dec 23, 2022  |  03:02 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: मयांक अग्रवालला सनरायजर्स हैदराबादने केलं खरेदी

टीम इंडियाचा बॅट्समन मयांक अग्रवाल याला खरेदी करण्यासाठी CSK आणि SRH टीम्सकडून जोरदार बोली लावली होती. अखेर सनरायजर्स हैदराबादने मयांक अग्रवाल याला 8 कोटी 50 लाखांना खरेदी केलं.

Dec 23, 2022  |  02:58 PM (IST)
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला सनरायजर्सने 13.25 कोटी रुपयांना केलं खरेदी
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला सनरायजर्सने 13.25 कोटी रुपयांना केलं खरेदी
Dec 23, 2022  |  02:54 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला सनरायजर्सने केलं खरेदी
इंग्लंडचा हॅरी ब्रूक याला लिलावात सनरायजर्सच्या टीमने खरेदी केलं आहे. सनरायजर्सच्या टीमने हॅरी ब्रूक याला 13.25 कोटी रुपयांत खरेदी केले.
Dec 23, 2022  |  02:52 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: हॅरी ब्रूकवर बोली 

इंग्लंडचा हॅरी ब्रूक याच्यावर बोली लावण्यास सुरुवात झाली आहे. हॅरी ब्रूकवर 8 कोटी रुपयांची बोली आतापर्यंत लागली आहे. 

Dec 23, 2022  |  02:46 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: केन विलियमन्सनला गुजरात टायटन्सने केले खरेदी

आयपीएल लिलावात न्यूझीलंडचा स्टार प्लेअर केन विलियमन्सनला गुजरात टायटन्सच्या टीमने 2 कोटी रुपयांत खरेदी केले. गुजरात टायटन्सच्या टीमने केन विलियमन्सनला बेस प्राईसवर खरेदी केले आहे.

Dec 23, 2022  |  02:43 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: लिलावापूर्वी आयपीएल अध्यक्षांचे भाषण

कोचीमध्ये आयपीएल 2023 च्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल हे उद्घाटन भाषण देत आहेत.

Dec 23, 2022  |  02:59 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: पहिल्या सेटमध्ये या स्टार प्लेअर्सवर बोली

मयांक अग्रवाल (भारत) - बेस प्राईस 1 कोटी रुपये
हॅरी ब्रूक (इंग्लंड) - बेस प्राईस 1.5 कोटी रुपये 
अजिंक्य रहाणे (भारत) - बेस प्राईस 50 लाख रुपये 
जो रूट (इंग्लंड) - बेस प्राईस 1 कोटी रुपये
रायली रूसो (दक्षिण आफ्रिका) - बेस प्राईस 2 कोटी रुपये
केन विलियमसन (न्यूझीलंड) बेस प्राईस 2 कोटी रुपये 

Dec 23, 2022  |  02:38 PM (IST)
IPL Auction 2023 LIVE: मिनी लिलाव सुरू

आयपीएल 2023 साठीच्या मिनी लिलावाला सुरुवात झाली आहे. कोचीमध्ये हा लिलाव सुरू आहे.