T20 Asia Cup मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
T20 Asia Cup मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs PAK T20 Live Score: Dahani ने 16 व्या षटकात 10 धावा दिल्या, ज्यामध्ये 3 वाइड्स आले. त्याचवेळी पांड्याने चार आणि जडेजाने तीन धावा केल्या. भारताला विजयासाठी आता 24 चेंडूत 41 धावांची गरज आहे. 16 षटकांनंतर, भारताची धावसंख्या 107/4, वाइड-5, लेग-बाय-4 आहे. रवींद्र जडेजा 22* आणि हार्दिक पांड्या 11* खेळत आहेत.
IND vs PAK T20 Live Score: मोहम्मद नवाजने 12 व्या षटकात 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या चेंडूवर जडेजाने चेंडू सीमापार नेला. फुलर बॉलला स्ट्रोल करत त्याने पुढच्या दिशेने चौकार मारला.
१२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ६९/३, वाइड-१, लेग-बाय-४. रवींद्र जडेजा ८* आणि सूर्यकुमार यादव ८* खेळत आहेत.
IND vs PAK T20 Live Score: कर्णधार रोहित शर्मा मोठा फटका खेळून बाद झाला आहे. रोहितला मोहम्मद नवाजने इफ्तिखार अहमदच्या हाती झेलबाद केले. रोहितने 12 धावांची खेळी खेळली. आता रवींद्र जडेजा क्रीझवर आला आहे. भारताची धावसंख्या 8.2 षटकांनंतर 2 बाद 51 अशी आहे. त्यानंतर लगेच विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजने विराटला इफ्तिखार अहमदकडे झेलबाद केले.
IND vs PAK T20 Live Score: लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुल पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नवोदित नसीम शाहचा बळी ठरला. राहुलला नीट कनेक्ट करता आले नाही आणि चेंडू त्याच्या बॅटच्या आतील कडा घेऊन विकेटमध्ये गेला. त्याचे खातेही उघडले नाही.
IND vs PAK T20 Live Score: पाकिस्तानने भारताला 148 धावांचे लक्ष्य दिले आहे. अर्शदीप सिंग भारतासाठी शेवटचे षटक टाकायला आला. त्याने शाहनवाज डहानीला गोलंदाजी देत पाकिस्तानचा डाव गुंडाळला. दहानीने 6 चेंडूत 2 षटकारांसह 16 धावा केल्या. हारिस रौफ 7 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला.
19.5 षटकांनंतर, पाकिस्तानची धावसंख्या 147/10, वाइड-4, बाय-1 आहे.
IND vs PAK T20 Live Score: हार्दिकने भारताला तिसरे यश मिळवून दिले. 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने इफ्तिखार अहदला आपला बळी बनवले. इफ्तिखार बाउन्सर खेचण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या काठावर आला. अशा स्थितीत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल घेतला. इफ्तिखारने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याने रिझवानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. 13 षटकांनंतर, पाकिस्तानची धावसंख्या 90/3, वाइड-2, बाय-1 आहे. मोहम्मद रिझवान 38* आणि खुशदिल शाह 1* खेळत आहेत.
IND vs PAK T20 Live Score: पाकिस्तानला दुसरा धक्का फखर जमानच्या रूपाने बसला आहे. सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो त्याच्या जाळ्यात अडकला. झमान स्लॅम केलेल्या चेंडूवर अप्पर कट करण्याचा प्रयत्न करत होता पण तो चुकला. त्याच्या बॅटची सुरेख धार घेत चेंडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात गेला. झमानने 6 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा केल्या.
6 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 43/2, वाइड-2. मोहम्मद रिझवान 20* आणि इफ्तिखार अहमद 1* क्रीझवर आहेत.
https://www.timesnowmarathi.com/cricket/matchcenter/india-vs-pakistan-match-2-scorecard-asia-cup-2022-inpk08282022215316
Asia Cup 2022: 5 षटकांचा खेळ संपला, पाकिस्तानचा स्कोअर 30/1
https://www.timesnowmarathi.com/cricket/matchcenter/india-vs-pakistan-match-2-scorecard-asia-cup-2022-inpk08282022215316
T20 Asia Cup : बाबर आझमला भुवनेश्वर कुमारने बाद केले
आता डबल हॉर्स पॉवरचे इंजिन आहे. केंद्रातून दिलेली स्क्रिप्ट जशीच्या तशी इथे बोलायची असते तसे ते बोलतात. रोहित पवार, अजित पवार आणि शरद पवार यांनी किती ही घेरण्याचा प्रयत्न केला तरी स्क्रिप्ट प्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करुन वागविण्याचा प्रयत्न चालू आहे. अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यंनी केली आहे.
- परवा साताऱ्याकडे जात असताना काही जणांनी मला चांदणी चौक वाहतूक कोंडी बद्दल सांगितले.मी अधिकाऱ्यांना पाहणी करून ब्रिज तोडून काही काम करावे लागणार आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल.काही समस्या आहेत त्या शंभर टक्के सुटतील
- या ब्रिज काम होईपर्यंत उद्यापासूनच १०० वाहतूक कर्मचारी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील.हेवी वहातुक पण व्यवस्थित केली जाईल.कालच सर्व सूचना देऊन ऍक्शन करून काम होईल
- पूर्वी काही झालं ते विसरून जा उद्यापासून काम सुरू करून पुढच्या १५ दिवसात सगळं व्यवस्थित सुरू करू.युद्धपातळीवर काम करून प्रश्न सोडवू
- हद्द वाद आता चांदणी चौकात येणार नाही सगळे शहर एकमेकांना जोडली आहेत पोलीस आणि प्रशासन आधी काम करा आणि मग हद्द बघा आशा सूचना दिल्या आहेत
- कोकणात जाणाऱ्या गाड्याना टोल मधून माफी दिली आहे
- हे जे सरकार आहे ते लोकांना दिलासा देणारं सरकार आहे.
- युद्ध पातळीवर उपाययोजना केली जाईल.
- ब्रीज तोडेपर्यंत इथे शंभर ट्रॅफिक वॉर्डन केली जाईल.
- या भागातील नागरिकांचा होणार त्रास दूर करण्याची जवाबदारी राज्यसरकार ची आहे.
- सगळे अधिकारी एकत्र आले आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान होईल आणि १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल अशी माहिती काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल यांनी दिली. तसेच १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन काँग्रेस अध्यक्ष जाहीर होईल असेही वेणुगोपाल म्हणाले.
CWC met under Sonia Gandhi & approved the final schedule. Nomination process for post of Congress president will be from Sept 24 to Sept 30. Elections to be held on October 17 & counting of polls & declaration of results will be on October 19: Congress MP KC Venugopal pic.twitter.com/AbK5SAu8vN
— ANI (@ANI) August 28, 2022
ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून बीड मधील एका पतसंस्थेने रात्रीतून आपला गाशा गुंडाळला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांवर दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स इथे मातोश्री महिला नागरी पतसंस्थेची शाखा आहे. तब्बल 14.50 टक्के व्याजाचे अमिश दाखवून पतसंस्थेने अनेक ठेवीदारांकडून ठेवी गोळा केल्या.
मात्र जून महिन्याच्या अखेरीस अचानक पतसंस्थेला टाळे लागले. त्यामुळे ठेवीदारांनी चेअरमन योगेश स्वामी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यामुळे नवा ट्वीस्ट निर्माण झाला होता. मात्र अखेर ठेवीदारांचा संयम सुटल्याने चेअरमन आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरामध्ये मागच्या तीन दिवसांपासून सुरु असणारा आयकर विभागाचा तपास अखेर आज थांबला आहे. सोलापुरातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी याबाबत अधिकृत माहिती माध्यमांना दिली.
मागच्या तीन दिवसांपासून सोलापूर शहरातील वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यालयाची तपासणी आयकर विभागाच्या पथकाकडून सुरु होती.
दरम्यान, डॉ. गुरुनाथ परळे यांचा अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर आणि अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी येथील व्यवस्थापनाशी असलेल्या संबंधाविषयी आयकर विभागाकडून विचारणा करण्यात आलेले डॉ. परळे यांचे आयसीआयसीआय बँकेतील सील करण्यात आलेले लॉकर्स ही आता सुरु करण्यात आलेले आहेत.
ट्विन टॉवर पाडले
चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची आज प्राण प्रतिष्ठापना सांगलीत करण्यात आली. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेश मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 200 वर्षांची ही परंपरा आहे. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा दरवर्षी शाही माहोल असतो. पंचायतन संस्थानच्या गणेशाची आगळी वेगळी परंपरा पण आहे. प्रसिद्ध अश्या गणपती मंदिरात प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते.गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते.
सांगलीत मात्र त्या अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. सांगलीमध्ये ही गेल्या 200 वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली आहे. हा दीड दिवस गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. हया मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते. त्याचे जतन केले जाते.या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची प्रतिष्ठापना होते. या ठिकाणी पाच दिवस गणेश आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या हया सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात.
संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती देत संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती.
आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली.व ती पॉझिटिव्ह आली.डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे.माझ्या संपर्कात आलेल्याना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) August 27, 2022
त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणं नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत.