मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा(indian premier league) १५वा हंगाम अर्धा संपत आला आहे. आयपीएल २०२२च्या पहिल्या टप्प्यात काही खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. यातीलच एक खेळाडू चायनामन स्पिनर कुलदीप यादव. 3 match, 3 win, kuldeep yavad became man of the match at third time
अधिक वाचा- लालफीत, दफ्तरदिरंगाई शब्दांना हद्दपार करा -मुख्यमंत्री ठाकरे
कुलदीप यादव गेल्या दोन वर्षांत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. लोकांना त्याच्याकडून कसलीच अपेक्षा उरली नव्हती मात्र आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सामील झाल्यानंतर कुलदीप यादवचा खेळ, आत्मविश्वास सारेच बदलले. तो सध्याच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करून पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध कुलदीपने ४ ओव्हरमध्ये २४ धावा देत २ विकेट मिळवल्या. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच निवडण्यात आले.
कोरोना संकटाविरुद्ध लढत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि संघाला ११५ धावांवर बाद केले. यानंतर विजयासाठी मिळालेल्या ११६ धावांचे आव्हान दिल्लीने १०.३ ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ९ विकेट राखून पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील ६ सामन्यांतील तिसरा विजय आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीला हा विजय ब्रेबॉर्न स्टेडियमवर मिळाला आहे आणि तीनही सामन्यात कुलदीप यादव मॅन ऑफ दी मॅच निवडण्यात आला.
कुलदीपच्या या जबरदस्त कामगिरीनंतर त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे. तो जबरदस्त लयीमध्ये गोलंदाजी करत आहे. याच कारणामुळे त्याला विकेटही खूप मिळत आहेत. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ६ सामन्यांतील ६ डावांत गोलंदाजी करताना कुलदीपने १३ विकेट मिळवल्या. यात त्याची सरासरी १४.३० आणि इकॉनॉमी रेट ७.८५ इतका आहे. त्याचा स्ट्राईक रेट १०.९२ आहे.
अधिक वाचा - घर मिळाल्यावर एका गरीब व्यक्तीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र!
कुलदीप यादवसाठी ब्रेबॉर्न स्टेडियम खूप लकी ठरले आबे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांत कुलदीपने १३ पैकी ९ विकेट मिळवल्यात. या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध १८ धावा देत ३ विकेट, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३५ धावा देत ४ विकेट आणि पंजाब किंग्सविरुद्ध २४ धावा हेत २ विकेट मिळवल्या आहेत. तीनही सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला आहे. याशिवाय अन्य ३ सामन्यांत कुलदीप यादवला ४ विकेट मिळवता आल्या.