MI vs KKR: आज KKR चा खेळ बिघडवायला उतरणार मुंबई पलटन; जाणून घ्या सामन्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

IPL 2022
Updated May 09, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

 IPL 2022 Match 56 Preview । आयपीलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईसाठी यंदाचा आयपीएल हंगाम एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. दरम्यान सोमवारी म्हणजेच आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत.

 56th match of IPL will be against Mumbai Indians Kolkata Knight Riders
आज KKR चा खेळ बिघडवायला उतरणार मुंबई पलटन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे १० सामन्यांत चार गुण आहेत.
  • मुंबई इंडियन्सचा संघ संघ प्लेऑफच्या शर्यातीतून बाहेर गेला आहे.

 IPL 2022 Match 56 Preview । मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईसाठी यंदाचा आयपीएल हंगाम एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. दरम्यान सोमवारी म्हणजेच आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. सध्या गुणतालिकेत तळाशी असलेला मुंबई इंडियन्सचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने आज मैदानात उतरेल. संघात वारंवार बदल करणे या हंगामामध्ये केकेआरला चांगलेच भारी पडले आहे. गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सकडून ७५ धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर केकेआरचा संघ मुंबईविरूद्ध मैदानात उतरेल. (56th match of IPL will be against Mumbai Indians Kolkata Knight Riders). 

अधिक वाचा : दोन वर्षानंतर विठूरायाला भेटणार वारकरी, आषाढी वारीची घोषणा

मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर 

दरम्यान, गुणतालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ गुजरात टायटन्सवर पाच धावांनी विजय मिळवल्याने मुंबईचा संघ मनोबल वाढवत मैदानात उतरेल. मुंबई आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे १० सामन्यांत चार गुण आहेत. ती जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंत पोहोचू शकते जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १२ गुण आहेत तर इतर तीन संघांचे १६ आणि १४ गुण आहेत.

नवनिर्वाचित कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांनी ११ सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांचे ११ गुण झाले आहेत. केकेआरचा संघ उर्वरीत तीन सामन्यांमध्ये जास्तीत जास् १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो पण तरीही तो चौथ्या स्थानावर मजल मारेल याची खात्री नाही. प्रतिकूल परिस्थिती असतानाही येथील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ आता आपल्या मोहिमेचा सकारात्मक शेवट करण्याचा प्रयत्न करतील.

आतापर्यंत मुंबई केकेआरला वरचढ

या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मुंबईने २२ सामने जिंकले असून केकेआरने आठ सामने जिंकले आहेत. हा विक्रम आणखी सुधारण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. मुंबईसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे दोन्ही सलामीवीर कर्णधार रोहित आणि ईशान किशन यांनी संघाला टायटन्सविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. केकेआरविरुद्ध ते आपल्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतील.

रोहितला IPL मध्ये ५००० धावा करण्यासाठी ८८ धावांची गरज 

रोहित मुंबईसाठी आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त ८८ धावा दूर आहे आणि सोमवारी तो हा टप्पा गाठू शकतो. मुंबईचे फलंदाज रोहित, किशन आणि सूर्यकुमार यादव पॉवरप्लेचा चांगला वापर करण्यात पटाईत आहेत. कोलकाताच्या संघाचा कोच मॅक्युलमने म्हटले की, “आम्ही पॉवरप्लेमध्ये संघर्ष केला आहे जो या संपूर्ण हंगामात आमच्यासाठी निराशाजनक होता. आम्ही संपूर्ण स्पर्धेत मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आणि डेथ ओव्हर्समध्येही आम्ही वाईट खेळलो नाही.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे - 

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंह, राहुल बुद्धि, रमनदीप सिंह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बासिल थप्पी, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, मुरूगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, कार्तिकेय सिंह, डेनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ॲलन, कायरन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि ईशान किशन, 

कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर (कर्णधार), आरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, अशोक वर्मा, पॅट कमिन्स, रसिख डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरूण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसल, अनुकुल रॉय, चमिका करूणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी