मुंबई: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल २०२२चा(ipl 2022 १५वा हंगाम आता प्लेऑफच्या दिशेने सरकत आहे. सर्व संघ टॉप ४मध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी जोर लावत आहेत. या लीगमधील दोन सगळ्यात मजबूत संघ मुंबई मुंबई इंडियन्स (MI)आणि सीएसके (CSK) बाहेर झाले आहेत. गुरूवारी दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्येही बदल झालेत आणि आता आणखी एक संघ प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या शर्यतीत आहे. After CSK, MI this team can be out of ipl
अधिक वाचा - सलमान खानच्या आगामी सिनेमात शहनाज गिलची एन्ट्री
५ वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबईचा संघ या हंगामात सलग ८ सामने हरून पहिल्यांदा बाहेर पडत आहे. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलंय की एखादा संघ सलग ८ सामने हरला आहे. अशीच स्थिती सीएसकेची आहे. त्यांनी आपल्या ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांत पराभव पाहिला. त्यामुळे हा संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. या दोन संघानंतर आणखी एक असा संघ आहे जो प्ले ऑफमधून बाहेर होऊ शकतो तो म्हणजे केकेआर.
आयपीएल २०२२मध्ये केकेआरची स्थितीही खराब आहे. केकेआर एकमेव असा संघ आहे ज्याने ९ सामन्यानंतरही आपले प्लेईंग ११ स्थिर ठेवलेले नाही ते सातत्याने ५ सामने हरलेत. या संघाला गुरूवारी दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ९ सामन्यानंतर केकेआरचे केवळ ६ गुण आहेत. केकेआर एक अथवा दोन सामने हरल्यास प्लेऑफमधून बाहेर जाऊ शकते.
अधिक वाचा - 'एसी लोकल'चा प्रवास होणार 'कूल', तिकिटांच्या दरात मोठी कपात
केकेआर आणि दिल्लीच्या सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठे बदल झालेत. गुजरात, राजस्थान, हैदराहाद आणि लखनऊ हे चार संघ टॉप ४मध्ये आहेत तर गेले दोन सामने हरणारी आरसीबी १० गुणांसह ५व्या स्थानावर आहे केकेआर सहाव्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्सचा संघ ८ गुणांसह ७व्या स्थानावर आहे.