Indian Team: रोहित नंतर या खेळाडूकडे असणार भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा 

Ravi Shastri On Rohit Sharma | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे तर काही दिग्गज खेळाडू त्यांना साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातीलच आघाडीवरील नाव म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा.

After Rohit, this player will have the responsibility of captaining India
रोहित नंतर हा खेळाडू असणार भारताचा नवा कर्णधार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • आयपीएलच्या १५ व्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे.
  • रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

Ravi Shastri On Rohit Sharma | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे तर काही दिग्गज खेळाडू त्यांना साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातीलच आघाडीवरील नाव म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या चालू हंगामात ९ पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. विराट कोहलीची भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर सध्या रोहितकडे भारतीय संघाची कमान आहे. (After Rohit, this player will have the responsibility of captaining India). 

अधिक वाचा : 'मेट गाला फॅशन वीक' मध्ये फक्त नताशाचीच हवा

हार्दिक पांड्या असणार नवा कर्णधार? 

दरम्यान, रोहित शर्माचा फॉर्म पाहता रोहित नंतर भारतीय संघाची कमान कोण सांभाळणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. निवड समिती देखील चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. आयपीएलच्या निमित्ताने के एल राहुल, हार्दिक पांड्या यांना आजमावण्याची संधी बीसीसीआयला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर होते. 

हार्दिक सध्या गुजरात टायटंसच्या संघाचा कर्णधार आहे. हार्दिकच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी  केली आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाची जबाबदारी पाड्यांकडे जाईल अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान के. एल राहुल देखील उत्तम कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत राहुलला काही खास कामगिरी करता आली नव्हती. 

 के.एल राहुलची उल्लेखनीय खेळी

आयपीएलमध्ये राहुलने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भविष्यातील कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. रवी शास्त्रींनी म्हटले की, के.एल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर असणार आहेत. या तिघांपैकी एकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी