KKR vs PBKS: पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवाल 'या' खेळाडूंवर संतापला 

IPL 2022
Updated Apr 02, 2022 | 09:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kolkata vs Punjab, Mayank Agarwal post match comments | पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरूध्दच्या पराभवासाठी आपल्या संघातील फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

After the defeat, Punjab Kings captain Mayank Agarwal got angry with the players
पराभवानंतर मयंक अग्रवाल या खेळाडूंवर संतापला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंजाब विरूध्दच्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवला.
  • आंद्रे रसेलने ७० धावांची आक्रमक खेळी केली.
  • मयंक अग्रवालने पराभवाला संघातील फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

Kolkata vs Punjab, Mayank Agarwal post match comments | मुंबई : पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरूध्दच्या पराभवासाठी आपल्या फलंदाजांना जबाबदार धरले आहे. उमेश यादवच्या (२३ धावांत ४ बळी) अशा घातक माऱ्यासमोर पंजाबचा संघ १८.२ षटकांत १३७ धावांवर गारद झाला. टीम साऊदीने देखील ३६ धावा देऊन २ बळी घेऊन पंजाबची खेळी अयशस्वी ठरवली. (After the defeat, Punjab Kings captain Mayank Agarwal got angry with the players). 

अधिक वाचा : २०२२ चा मार्च महिना १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला

प्रत्युत्तरात केकेआरच्या संघाकडून आंद्रे रसेलने ३१ चेंडूत आठ षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद ७० धावांच्या जोरावर विजय मिळवला. यामध्ये सॅम बिलिंग्जच्या २३ चेंडूत नाबाद २४ धावांचे देखील योगदान राहिले. लक्षणीय बाब म्हणजे या दोघांनी पाचव्या बळीसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीमुळे केकेआरने १४.३ षटकांत पंजाबने दिलेले आव्हान गाठले. ४ बळी गमावून १४१ धावांवर सहज विजय मिळवला. तर कर्णधार श्रेयस अय्यर २६ धावा करून बाद झाला. 

अधिक वाचा : BJP खासदाराने मांडले लोकसंख्या नियंत्रण विधेयक

पंजाब किंग्जकडून राहुल चाहरने चार षटकांत फक्त १३ धावा दिल्या आणि २ बळी पटकावले. मात्र चाहरला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबचा कर्णधार अग्रवालने आक्रमक खेळी करणाऱ्या आंद्रे रसेलचे कौतुक केले. अग्रवालने सामना झाल्यानंतर म्हटले, "आम्ही चांगली फलंदाजी नाही केली. गोलंदाजीत आम्ही सुरूवातीपासून चांगली टक्कर दिली यानंतर आंद्रे रसेलने आक्रमक खेळी केली. त्यासाठी विजयाचे श्रेय त्याला जाते. आम्ही ५० धावांच्या जवळपास विरोधी संघाचे ४ गडी बाद केले होते मात्र रसेलने सामना आमच्यापासून हिरावून घेतला आमच्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे."

त्याने आणखी म्हटले, "१७० च्या आसपास धावा करण्यासारखी ही खेळपट्टी होती. मला वाटतं आम्ही चांगली सुरूवात केली मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही, काही बळी सहज गेले, तसेच स्पर्धेच्या सुरूवातीला अशा सामन्यामुळे फारशी समस्या येत नाही." 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी