Rohit Sharma Fined: पराभवानंतर रोहितला लाखो रूपयांचा फटका; मुंबईच्या संघालाही मिळाली शिक्षा 

IPL 2022
Updated Apr 14, 2022 | 10:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईच्या संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही.

Mumbai Indians captain Rohit Sharma fined Rs 24 lakh
पराभवानंतर रोहित शर्माला लाखो रूपयांचा फटका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • आयपीएल कमिटीने एक अहवाल जारी करून याबाबत माहिती जारी केली.

IPL 2022 | मुंबई : सध्या आयपीएलचा (IPL 2022) थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईच्या (Mumbai Indians) संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सच्या हातातून विजय खेचून घेतला आणि रोहितच्या आर्मीला १२ धावांनी चितपट केले. (After the defeat, Rohit was hit with lakhs of rupees, Mumbai team also got punishment).

अधिक वाचा : जंगलात शिकारीला गेलेल्या चौघांनी घोरपडीवर केला रेप

पराभवानंतर रोहितला लाखोंचा फटका 

लक्षणीय बाब म्हणजे या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ आणि कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) मोठे नुकसान झाले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या उर्वरित खेळाडूंना ६ लाख किंवा २५ टक्के सामन्यातील फी यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सला मिळाली शिक्षा 

आयपीएल कमिटीने (IPL) एक अहवाल जारी करून म्हटले की, "आयपीएल आचारसंहितेच्या अंतर्गत हंगामातील हा संघाचा स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित दुसरा गुन्हा आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला २४ लाख रुपये आणि उर्वरित प्लेइंग इलेव्हनला ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्ससाठी पुढचा रस्ता कठीण 

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र चालू हंगामात मुंबई इंडियन्सला ५ पैकी सर्व ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील. बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना १२ धावांनी गमावला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी