IPL 2022: परत ये माही...धमाकेदार धोनी स्टाईल विजयानंतर सेहवाग, जाफरने लिहिले असे काही...

IPL 2022
Updated Apr 22, 2022 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

CSK vs MI IPL 2022 Match: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या बॉलवर मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून दिला. 

ms dhoni
IPL: धोनी स्टाईल विजयानंतर सेहवाग, जाफरचे जबरदस्त ट्वीट 
थोडं पण कामाचं
  • एमएस धोनीने धमाकेदार अंदाजात चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या बॉलवर विजय मिळवून दिला. 
  • चेन्नई सुपर किंग्सने दुसरा विजय मिळवला. 
  • मुंबई इंडियन्सचा सलग ७वा पराभव

मुंबई: सलग ६ सामने हरणारी पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सला(mumbai indians) गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध(chennai super kings) मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. असे वाटले होते मुंबई इंडियन्स आपला पहिला विजय चेन्नईविरुद्ध साजरा करेल. मात्र पुन्हा सीएसकेच्या मदतीला धोनी धावून आला आणि त्याने शेवटच्या बॉलवर सामन्याचे चित्रच बदलले. सामन्यात पुन्हा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या क्षणी महेंद्रसिंग धोनी धावून आला आणि त्याने चेन्नईला आपल्या स्टाईलमध्ये विजय मिळवून दिला. IPL: धोनी स्टाईल विजयानंतर सेहवाग, जाफर असं काही म्हणाला की.After win in ms dhoni style virendra sehwag and wasim jafar says about him on twitter

अधिक वाचा - कोरोनाचा बूस्टर डोस आवश्यक असल्याचे अदर पूनावालांचे म्हणणे

मुंबई इंडियन्सविरुद्ध महेंद्रसिंग धोनी पुन्हा फिनिशर अंदाजात दिसला. मुंबईविरुद्ध शेवटच्या ४ बॉलमध्ये त्याने १६ धावा ठोकताना त्याने आपल्या चाहत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे या सामन्यात फिनिशर बनलेला धोनी हा काही युवा खेळाडू नाही तर ४० वर्षीय क्रिकेटर आहे. 

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला १७ धावांची गरज होती आणि यावेळेस धोनीने आपला अनुभव दाखवत शानदार विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलवर जोरदार शॉट मारत बाऊंड्री ठोकताना मुंबई इंडियन्सला सलग ७वा पराभवाचे तोंड पाहावे लागले. चेन्नई सुपर किंग्सच्या या विजयानंतर माजी दिग्गज भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारा माजी क्रिकेटर वसीम जाफरने धोनीचे कौतुक केले. 

राष्ट्रीय संघात असताना वीरेंद्र सेहवाग आणि धोनी यांच्यातील मतभेद साऱ्यांनाच माहिती आहे. मात्र दोन्ही खेळाडूंनी यावर स्पष्टीकरण देताना असे काही नव्हते असे सांगितले. धोनीची आणखी एक धमाकेदार खेळी पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, एमएस धोनी...OM Finishaya Namah, काय विजय आहे. रोम्बा Nalla'. 


तर भारताचा माजी फलंदाज आणि सोशल मीडियावर सातत्याने मीम्स पोस्ट करणाऱ्या वसीम जाफरनेही एक मजेदार व्हिडिओच्या माध्यमातून धोनीचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले, अशा पद्धतीने धोनीने चेन्नई सुपर किंग्सला जिंकून दिले. 

जाफर आणि सेहवागव्यतिरिक्त अनेक माजी क्रिकेटर्सनी आपापल्या अंदाजात एमएस धोनीचे कौतुक केले आहे. भारताचा माजी गोलंदाज आरपी सिंहने तर धोनीने आपली रिटायरमेंट मागे घ्यावी अशी मागणीही केली. 

अधिक वाचा - सलमान खानची ८३ वर्षांची आई स्क्रीनवर पुन्हा दिसणार

या रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी १५६ धावा हव्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्या संघाला विजयासाठी १७ धावा हव्या होत्या. धोनीने शानदार खेळ करत शेवटच्या बॉलवर बाऊंड्री मारत चेन्नईला या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी