आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सर्व माहिती ; जाणून घ्या सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाची माहिती

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 04, 2021 | 20:15 IST

येत्या ९ एप्रिलपासून देशात इंडियन प्रिमियमर लीगच्या (आयपीएल) १४ हंगामातील रणसंग्राम सुरू होणार आहे.

All the details of the 14th season of IPL
आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सर्व माहिती  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • यंदा आयपीएलचे सामने न्युट्रल ठिकाणी होतील.
 • मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये पहिली लढत.
 • अंतिम सामना होणार ३० मे ला

नवी दिल्ली : येत्या ९ एप्रिलपासून देशात इंडियन प्रिमियमर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील रणसंग्राम सुरू होणार आहे. मागील १३ वा हंगाम कोविड-१९ मुळे संयुक्त अरब आमिरातीत (UAE ) आयोजित करण्यात आला होता. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असतानाही आयपीएलची स्पर्धा खेळवली जाणार आहे. सर्व सामने हे जैव- सुरक्षित पद्धतीने आयोजित केले जाणार असून चाहत्यांना आयपीएलचा थरार समक्ष उपस्थितीत राहून पाहता येणार नाही. 

भारत- इंग्लंडच्या मालिकेसाठी बीसीसीआयने प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली होती. पण अहमदाबादमध्ये कोविडचे रुग्ण वाढल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि प्रेक्षकांना प्रवेश बंदी करण्यात आली. आयपीएल २०२१ चे सामने सहा वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जाणार आहेत. तर ८ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून स्पर्धेच्या कालावधीत  ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये खेळ खेळण्यासाठी प्रवास करतील. यावर्षी होणाऱ्या आयपीएलची सर्वात खास गोष्ट म्हणजे कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही, त्यामुळे सर्व संघांच्या लढती या न्यूट्रल ठिकाणी होतील.

आयपीएलवरील कोरोना संकट 

आयपीएल सुरू होण्यास एक आठवडा बाकी असतानाच कोविडने आयपीएलला आपल्या विळख्यात घेतले आहे.  अक्षर पटेल, देवदत्त  पडिक्कल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. वानखेडे स्टेडियमचा कर्मचारी वर्ग आणि सीएसकेचा कंटेंट टीमचा सदस्यही कोरोनाबाधित झाले आहेत. जे कोरोना बाधित झाले आहेत त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते. यामुळे संघात येण्यासाठी त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत नियमाप्रमाणे विलगीकरणात राहावे लागेल. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकता, बंगळुरू, आणि चेन्नईमध्ये ही स्पर्धा होणार आहे.  

 
आयपीएलचे वेळापत्रक 

आयपीएलचे १४ चे सत्र ९ एप्रिलपासून सुरू होणार असून चेन्नईमध्ये पहिली लढत होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मध्ये होणार आहे. तर प्लेऑफचे सामने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. अहमदाबादेत हे सामने खेळवले जाणार असून  आयपीएलचा अंतिम सामना हा ३० मे रोजी अहमदाबादेत खेळवला जाईल. 

काय स्थिती आहे आयपीएल संघांची; कोण -कोण आहे संघात 

यंदाच्या  २०२१ या आयपीएल हंगामात काहीसे बदल झाले आहेत. दिल्ली कॅपिटलने त्यांच्या कर्णधाराला गमावले आहे.  यावेळी श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये नसणार. खांद्याच्या दुखापतीमुळे अय्यर या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू मिशेल मार्श स्पर्धेतून माघारी गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये काही बदल झाले आहेत. जोश फिलिप्पच्या जागेवर फिन एलनला दाखल करण्यात आले आहे.

संघामधील खेळाडूची नावे 

 1. मुंबई इंडियन्स :  रोहित शर्मा(कर्णधार), अदित्य तारे, अनमोलप्रित सिंग, अनकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रित बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बाउल्ट, अ‍ॅडम मिलने, नॅथन कॉल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशान, युधवीर चरक, मार्को जेन्सेन, अर्जुन तेंडुलकर
 2. चेन्नई सुपर किंग्स :  एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, नारायण जगदीसन, ऋतुराज गायकवाड, केएम असिफ, करन शर्मा, अंबाती रायडू, दिपक चहर, फाफ डू प्लेसिस, शार्दुल ठाकुर, मिशेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम कुर्रान, रवींद्र जडेजा, इम्रान ताहिर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, के गौथम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिसंकर रेड्डी, के. भागथ वर्मा, सी हरी निशांत , आर साई किशोर
 3. दिल्ली कॅपिटल्स :  रिषभ पंत (कर्णधार), अंजिक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमीयर, ख्रिस वॉक्स, अॅनरिच नॉर्टजे , स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज, प्रवीण दुबे, विष्णू विनोद
 4. कोलकाता नाईट रायडर्स :  इयोन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रशांत कृष्णा, गुरकीतसिंग मान, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, पवन नेगी, टिम सेफर्ट, साकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर
 5. पंजाब किंग्स : केएल राहुल ( कर्णधार ), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मंदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसीमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल , डेव्हिड मालन, झ्ये रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोइसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन अॅलन, सौरभ कुमार
 6. राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्ट्रोक्स, जोफ्रा अर्चर, जॉस बटलर, रियान पराग, श्रेयस पराग, श्रेयस गोपाल, राहूल तेवतिया, महिपाल लॉमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहीम, चेतन साकारीया, के.सी. कॅरियप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग
 7. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पद्धिकल, हर्षल पटेल, डॅनियल सॅम, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झांपा, शाहबाज अहमद, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमीसन, डॅन ख्रिश्चन, सुयेश प्रभुदेसाई, के.एस. भारत, फिन एलन
 8. सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, जेसन रॉय, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियांम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, विजय शंकर , मोहम्मद नबी, रशीद खान, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत गोस्वामी, बासिल थंपी, जेसन होल्डर, जगदेश सुचित, केदार यादव, मुजीब उर रहमान


आयपीएल सामन्यांची वेळ 

यंदा आयपीएलचे सामने अर्धा तास आधी सुरू होतील. संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतील तर दुपारी सामन्यांची सुरुवात साडेतीन वाजता होईल.


कुठे - कुठे बघायला मिळेल आयपीएल  - कोठे होईल टेलिकास्ट 


आयपीएल २०२१ लाईव्ह टेलिकास्ट हे स्टार स्पोर्टस नेटवर्क वाहिनीवर होईल. यासह स्टार स्पोर्ट्स 1 (आणि एचडी), स्टार स्पोर्ट्स 3 (आणि एचडी) आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या इतर अनेक चॅनेलवर हे सामने प्रसारित केले जातील.

लाईव्ह स्ट्रीमिंग

आयपीएल 2021 स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (हॉटस्टार) , जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर थेट स्ट्रीमिंग  केले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी