KKR vs DC Andre Russell:पुन्हा एकदा आंद्रे रसेलचा अफलातून धमाका

IPL 2019
Updated Apr 13, 2019 | 12:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2019 Season 12 KKR vs DC: वेस्टइंडिजचा ऑलराऊडर आंद्रे रसेलनं शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा आपली धमाकेदार खेळी सर्वांना दाखवून दिली. आंद्रे रसेलनं आयपीएलच्या कारकिर्दीत बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

Andre russell
KKR vs DC Andre Russell:पुन्हा एकदा आंद्रे रसेलचा अफलातून धमाका  |  फोटो सौजन्य: Twitter

IPL 2019 Delhi Captials Andre Russell: शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा वेस्टइंडिज ऑलराऊडर आंद्रे रसेलनं आपला जलवा दाखवला. केवळ बॅटिंगच्या रूपात नव्हे तर ऑलराऊडरच्या रूपात देखील रसेलनं एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होता. सामन्यात आंद्रे रसेलच्या जोरावर कोलकत्ता नाईट रायडर्सनं १७९ धावाचं आव्हान समोरच्या टीमला दिलं. मात्र शिखर धवन (९७) च्या शानदार खेळीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं हे आव्हानं पूर्ण केलं. दरम्यान तरी देखील रसेलचं प्रदर्शन सगळ्याच्याच लक्षात राहण्यासारखं होतं. जाणून घेऊया या खेळात रसेलनं कोणता नवीन रेकॉर्ड बनवला आहे. 

या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सच्या टीमनं टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. शुभमन गिलनं केलेल्या ६५ धावांच्या खेळाच्या जोरावर त्यांची टीम चांगल्या स्थितीत होती. मात्र शुभमन आऊट झाल्यानंतर आंद्रे रसेलवर मोठी जबाबदारी होती. रसेलनं पुन्हा एकदा आपला जलावा दाखवून दिला आणि २१ बॉलमध्ये ४५ रनची खेळी केली. या धमाकेदार खेळीत रसेलनं ४ सिक्स आणि ३ फोर मारले. ज्याच्या जोरावर २० ओव्हरमध्ये कोलकत्ताच्या टीमनं १७८ रन बनवले. 

रसेलच्या नावावर हे आहेत खास रेकॉर्ड 

आंद्रे रसेलनं दोन खास रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केले आहेत. त्यात एक तर आयपीएलमध्ये सर्वांत जास्त 40+ स्कोर करण्यामध्ये आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानावर आला आहे. रसेलनं ६ वेळा ४० पेक्षा जास्त स्कोर केला आहे. या यादीत कोलकत्ता नाईट रायडर्सचा रॉबिन उथप्पा आहे. ज्यानं १० वेळा 40+ स्कोर केला होता. 

Andre Russell

या व्यतिरिक्त रसेलनं आता आयपीएलमध्ये सर्वांत कमी सामन्यात १००० धावा आणि ५० विकेट अशी खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. रसेलनं ही कमाल ५७ सामन्यात करून दाखवली आहे आणि या बाबतीत किरोन पोलार्ड (६२ सामने) ला मागे टाकलं आहे. 

ही आहे या टॉप ५ खेळांडूंची यादी ज्यात एका भारतीय खेळाडूचं नाव नाही आहे. पाच पैकी ३ खेळाडू हे वेस्टइंडिजचे आहेत. 

  1. आंद्रे रसेल - ५७ सामने 
  2. किरोन पोलार्ड - ६२ सामने 
  3. शेन वॉटसन - ६२ सामने 
  4. ड्वेन ब्रावो - ७८ सामने
  5. जॅक्स कॅलिस - ७९ सामने 

आतापर्यंत केलेले षटकार 

आंद्रे रसेलनं आतापर्यंत या आयपीएलमध्ये दोन अर्धशतकीय खेळी आणि याव्यतिरिक्त चार 40+ धावांची खेळीच्या जोरावर ७ सामन्यात ३०२ रन केले आहेत. दिल्लीविरूद्ध सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. आंद्रे रसेल आतापर्यंत या आयपीएलच्या सिझनच्या ७ सामन्यात एकूण २९ षटकार मारले आहेत. तर २० चौकार मारले. षटकारांच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर क्रिस गेल आहे जो किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळत आहे. गेलनं ६ सामन्यात १८ षटकार मारले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
KKR vs DC Andre Russell:पुन्हा एकदा आंद्रे रसेलचा अफलातून धमाका Description: IPL 2019 Season 12 KKR vs DC: वेस्टइंडिजचा ऑलराऊडर आंद्रे रसेलनं शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा आपली धमाकेदार खेळी सर्वांना दाखवून दिली. आंद्रे रसेलनं आयपीएलच्या कारकिर्दीत बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola