IPL 2019 : आंद्रे रसेलने उघडले आक्रमक फलंदाजीचे गुपित

IPL 2019
Updated Mar 28, 2019 | 17:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IPL 2019 : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे रसेलने सध्याच्या आयपीएलच्या हंगामातील आपल्या धडाकेबाज फलंदाजीचे गुपित उघडले आहे.

andre russell
आंद्रे रसेल  |  फोटो सौजन्य: PTI

कोलकाता : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात मुख्य योगदान देणारा क्रिकेटर आंद्रे रसेलने आपल्या आक्रमक फलंदाजीचे गुपित उघडले आहे. तो म्हणाला, फलंदाजीदरम्यान जर चेंडू स्लॉटमध्ये असतो तेव्हा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. रसेलने १७ चेंडूत ४८ धावा करत ईडन गार्डनवर कोलकात्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर रसेल म्हणाला, तुम्हाला माहीत पाहिजे की नेमके तुम्हाला काय करायचे आहे ते. फलंदाजीदरम्यान दर चेंडू स्लॉटमध्ये असेल तर मी मोठा शॉट खेळतो. मी अनेक वर्षांपासून ही ट्रिक वापरत आहे आणि ही ट्रिक चालते सुद्धा. मी खुश आहे. 

दरम्यान, रसेलचा डाव सुरू होण्याआधीच संपला असता. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला यॉर्कर टाकत बाद केले होते. मात्र त्यावेळी पंजाबचे केवळ तीन क्रिकेटर ३० यार्डाच्या आत होते ज्यामुळे अंपायरने तो बॉल नो बॉल जाहीर केला. रसेल पुढे म्हणाला, ३० यार्डाच्या बाहेर उभ्या असलेल्या क्रिकेटर्सचे आभार. तो एक नवा क्रिकेटर होता, मी त्याचे नाव विसरलो. मात्र खूप छान, धन्यवाद. जेव्हा मी बाद झालो तेव्हा मी विचार केला की मी संधी चुकवली. मात्र जेव्हा मी पाहिले की डगआऊटमध्ये सगळे नो बॉलचा इशारा करत होते तेव्हा मी विचार केला हे देवा, हा फ्रंट फुटवाला नो बॉल असला पाहिजे आणि मला फ्री हिट मिळाली पाहिजे. मात्र त्याचवेळी समजले की एक क्रिकेटर ३० यार्डाच्या बाहेर उभा होता आणि मी त्या संधीचा लाभ घेतला. तुम्हाला दररोज अशा संधी मिळत नाहीत आणि या संधीचा फायदा उचलला पाहिजे. 

रसेलने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही दमदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या हंगामात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा त्याचे चाहते करत आहेत. कोलकाताचा पुढील सामना दिल्लीविरुद्ध असणार आहे. हा सामना ३० मार्चला फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019 : आंद्रे रसेलने उघडले आक्रमक फलंदाजीचे गुपित Description: IPL 2019 : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे रसेलने सध्याच्या आयपीएलच्या हंगामातील आपल्या धडाकेबाज फलंदाजीचे गुपित उघडले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola