आयपीएलच्या फायनलमध्ये खेळणार केकेआरचा विस्फोटक फलंदाज

IPL 2021
Updated Oct 14, 2021 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

केकेआरचा विस्फोटक ऑलराऊंडर आंद्रे रसेल यूएई टप्प्यात संघाकडून तीन सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. 

kkr
आयपीएलच्या फायनलमध्ये खेळणार केकेआरचा विस्फोटक फलंदाज 

थोडं पण कामाचं

  • हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यानतंर रसेल काही सामन्यातून बाहेर गेला मात्र चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तो फायनल खेळू शकतो. 
  • भारतात आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात या फलंदाजाने सीएसकेविरुद्ध ३० चेंडूत ५४ धावांची विस्फोटक खेळी केली होती.
  • याशिवाय रसेलने २०१८मध्ये सीएसकेविरुद्ध ३६ चेंडूत ८८ आणि २०१४मधये २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती. 

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य सल्लागार डेविड हसीने म्हटले आहे की संघाचा दुखापतग्रस्त आंद्रे रसेलची इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. हसी केकेआरच्या मध्यम फळीतील फलंदाजांच्या निष्क्रियतेबाबत चिंतित नही. असे असतानाही केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला तीन विकेटनी हरवले. हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यानतंर रसेल काही सामन्यातून बाहेर गेला मात्र चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तो फायनल खेळू शकतो. 

हसीने दिल्लीवर मिळालेल्या विजयानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले, दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी तो गोलंदाजी करत होता त्यामुळे तो खेळू शकतो. रसेलचा चेन्नईविुरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. भारतात आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात या फलंदाजाने सीएसकेविरुद्ध ३० चेंडूत ५४ धावांची विस्फोटक खेळी केली होती. दरम्यान, केकेआर हा सामना १८ धावांनी हरला होता. याशिवाय रसेलने २०१८मध्ये सीएसकेविरुद्ध ३६ चेंडूत ८८ आणि २०१४मधये २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती. 

१३६ या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने ३.५ ओव्हरमध्ये सात धावांत सहा विकेट मिळवल्या होत्या. राहुल त्रिपाठीने अखेरच्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. हसीने सांगितले मी मध्यम फळीतील फलंदाजाच्या निष्क्रियतेने चिंतित नाही. कारण हा शानदार खेळाडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासासह दुबईला जात आहे आणि काय होईल कोणी काय सांगू शकत नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी