IPLमुळे आपापसात भिडले होते हे क्रिकेटर, पैशांवरून झाला होता वाद

IPL 2022
Updated Apr 25, 2022 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Andrew Symonds: अँड्र्रू्यू सायमंड्सने नुकताच एक खुलासा केला की आयपीएलच्या पैशांमुळे त्याच्यात आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांच्या नात्यात विष पेरण्याचे काम केले होते. 

Andrew symonds
IPLमुळे भिडले होते हे क्रिकेटर, पैशांवरून झाला होता वाद 
थोडं पण कामाचं
  • माजी क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सने मोठा दावा केला आहे की आयपीएलच्या पैशांमुळे त्याच्यात आणि माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या नात्यात विष मिसळण्याचे काम केले होते.
  • हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकत्र खेळत होते. 
  • नुकत्याच द ब्रेट ली पॉडकास्टवर बोलताना अँड्र्यू सायमंड्सने हा किस्सा आठवला

मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत ३७ सामने झाले आहेत. हंगामात असतानाच आयपीएलशी संबंधित एक बाब समोर आली आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सने मोठा दावा केला आहे की आयपीएलच्या पैशांमुळे त्याच्यात आणि माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या नात्यात विष मिसळण्याचे काम केले होते. हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकत्र खेळत होते. Andrew symonds controversy with micheal clark over ipl 

अधिक वाचा - लग्नसराईत मोठी संधी! सोने स्वस्त झाले हो, 1,800 रु.ची घसरण

सायमंड्सने लगावला होता आरोप

२०१५मध्ये अँड्र्यू सायमंड्सने क्लार्कच्या नेतृत्वावर टीका केली होती त्या वेळेस सायमंड्स आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने आरोप लगावले होते की हा क्रिकेटर २००८मध्ये वनडे मालिका खळण्याआधी नशेत होता. त्यावेळेस दोन्ही क्रिकेटर्समध्ये मतभेद होते. यानंतर २०१५ अॅशेस डायरीजमध्ये क्लार्कने सायमंड्सच्या आरोपांवर उत्तर देताना लिहिले होते, माझ्या नेतृत्वावर टीका करून अँड्र्यू सायमंड्स टीव्हीवर गेला आहे. मला दुख होतंय मात्र तो नेतृत्वाच्या आधारावर कोणाला आजमावणारी व्यक्ती नाही. 

सायमंड्सचा मोठा खुलासा 

नुकत्याच द ब्रेट ली पॉडकास्टवर बोलताना अँड्र्यू सायमंड्सने हा किस्सा आठवला आणि अँड्र्यूने खुलासा केला, मॅथ्यू हेडनने त्याला सांगितले होते की त्याला आयपीएलमध्ये जास्त पैसा मिळण्याच्या कारणामुळे क्लार्कच्या मनात ईर्ष्याची भावना निर्माण झाली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८मध्ये सायमंड्स सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याला डेक्कन चार्जर्सने ५.४ कोटी रूपयांना खरेदी केले होते. 

अधिक वाचा - मंगेशकर कुटुंबीयांची कृतीने 12 कोटी माणसांचा अपमान-आव्हाड

द ब्रेट ली पॉडकास्टवर सायमंड्स हे म्हणाला

द ब्रेट ली पॉडकास्टवर बोलताना सायमंड्स म्हणाला, आम्ही जवळ आलोय. जेव्हा क्लार्क संघात आला होता तेव्हा मी त्याच्यासोबत फलंदाजी करत होतो. यासाठी जेव्हा तो संघात आला तेव्हा मी त्याची पूर्ण काळजी घेतली. आमच्यात एक नाते झाले होते. त्याने सांगितले, मला वाटते की पैसा मजेदार गोष्टी करतोय. ही चांगली गोष्ट आहे मात्र हे विषही ठरू शकते. मला वाटते की यामुळे आमच्या नात्यात विष टाकण्याचे काम केले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी