दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Apr 14, 2021 | 19:47 IST

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना उद्या (गुरुवार) आहे. पण त्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला.

anrich nortje the delhi capitals fast bowler tests positive for covid 19 in ipl 2021
दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना 

थोडं पण कामाचं

  • दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना
  • दोन विदेशी खेळाडू क्वारंटाइन होण्याची शक्यता
  • अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीवर परिणाम होणार

नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना उद्या (गुरुवार) आहे. पण त्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार गोलंदाज एनरिच नोर्जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. सध्या तो क्वारंटाइन राहून उपचार घेत आहे. नियमानुसार बरा झाल्यानंतर ठराविक तासांच्या अंतराने त्याच्या दोन कोरोना चाचण्या होतील. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या तरच तो पुन्हा बायो बबलमध्ये दाखल होईल. anrich nortje the delhi capitals fast bowler tests positive for covid 19 in ipl 2021

भारतात आल्यावर एनरिच नोर्जे चौदा दिवस क्वारंटाइन होता. नंतर त्याने सराव सुरू केला होता. तो बायो बबलच्या नियमांचे पालन करत होता. याच कारणांमुळे एनरिच नोर्जेला कोरोना झाल्याचे कळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. एनरिच नोर्जेच्या संपर्कात आलेल्यांपैकी अन्य कोणालाही कोरोना झाला आहे की नाही याची तपासणी सुरू आहे.

अद्याप अधिकृतरित्या एनरिच नोर्जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केलेले नाही. मात्र तो एनरिच नोर्जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा एकदा क्वारंटाइन झाल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. याआधी नितीश राणा आणि देवदत्त पडिक्कल हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले होते. मात्र दोघांना आयपीएलमध्ये सहभागी होण्याआधी कोरोना झाला होता, अशा स्वरुपाचे वृत्त नंतर प्रसिद्ध झाले. 

एनरिच नोर्जे, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि कगिसो रबाडा हे चार खेळाडू पाकिस्तानमधील लीगचे निवडक सामने खेळल्यानंतर आयपीएलसाठी भारतात दाखल झाले. यापैकी एनरिच नोर्जे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. क्विंटन डी कॉक मंगळवारी कोलकाता विरुद्ध मुंबईच्या संघाकडून खेळला तर एनरिच नोर्जे आणि कगिसो रबाडा दिल्लीकडून राजस्थान रॉयल्स विरोधात खेळणार होते. मात्र एनरिच नोर्जे पुन्हा क्वारंटाइन झाल्यामुळे कगिसो रबाडा खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॅच सुरू होईल त्यावेळी किंवा त्याच्या थोडेसे आधी दिल्ली कॅपिटल्सकडून या प्रश्नाचे उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. 

एनरिच नोर्जे आणि कगिसो रबाडा एकाच विमानाने भारतात आले आणि दिल्ली कॅपिटल्सच्या बायो बबलमध्ये दाखल झाले होते. यामुळे एनरिच नोर्जे पाठोपाठ कगिसो रबाडालाही क्वारंटाइन केले जाण्याची शक्यता आहे. एनरिच नोर्जे आणि कगिसो रबाडा क्वारंटाइन राहणार असतील तर दिल्लीकडून कोण कोणते विदेशी खेळाडू खेळणार या प्रश्नाचे उत्तर मॅच सुरू होईल त्यावेळी किंवा त्याच्या थोडेसे आधी मिळण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी