arjun tendulkar debut in ipl 2023 from mumbai indians in mi vs kkr match on wankhede stadium at mumbai : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या मॅचद्वारे अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे अर्जुनला मॅचची पहिली ओव्हर टाकण्याची संधी मिळाली.
अर्जुनने पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या. पण त्याने ज्या प्रकारे बॉलिंग केली ते बघून प्रेक्षक तसेच कॉमेंट्रेटर खूष झाल्याचे दिसले. अर्जुनने पहिल्या बॉलवर एकही धाव दिली नाही. दुसऱ्या बॉलवर दोन आणि तिसऱ्या बॉलवर एक धाव दिली. चौथ्या बॉलवर लेग बायची एक धाव कोलकाताला मिळाली. यानंतर अर्जुनने पाचव्या बॉलवर एकही धाव मिळू दिली नाही. नंतरचा बॉल हा ओव्हरचा शेवटचा बॉल होता. या बॉलवर कोलकाताच्या सलामीच्या जोडीने एक धाव काढली.
कोलकाता विरुद्धच्या मॅचसाठी सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीमचे नेृत्व करत आहे. रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळत नसल्यामुळे यादवकडे नेतृत्व देण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 पैकी 1 मॅच जिंकली आहे आणि उरलेल्या 2 मॅच गमावल्या आहेत. मुंबईकडे फक्त 2 पॉइंट आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी आहे. यामुळे कोलकाता विरुद्ध मुंबई इंडियन्स काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
मुंबई इंडियन्स : ईशान किशन (विकेटकीपर) , कॅमरन ग्रीन , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कॅप्टन) , टिम डेव्हिड , नेहल वढेरा , अर्जुन तेंडुलकर , हृतिक शौकीन , पीयूष चावला , डुआन जानसन , रिले मेरेडिथ
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानुल्लाह गुरबाझ (विकेटकीपर) , वेंकटेश अय्यर , एन जगदीसन , नितीश राणा (कॅप्टन) , रिंकू सिंह , आंद्रे रसेल , सुनील नरेन , शार्दुल ठाकुर , उमेश यादव , लॉकी फर्ग्यूसन , वरुण चक्रवर्ती
IPL ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिले आहे?
हेल्मेटविषयीचे हे नियम माहिती आहेत का?