मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर होतोय सज्ज

Arjun Tendulkar in UAE with Mumbai Indians मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर सज्ज होत आहे.

Arjun Tendulkar in UAE with Mumbai Indians
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर होतोय सज्ज 

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर होतोय सज्ज
  • अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज
  • मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

अबुधाबी (Abu Dhabi): मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians - MI) खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सज्ज होत आहे. संयुक्त अरब आमिरातीमधील (United Arab Emirates - UAE) अबुधाबी शहरात १९ सप्टेंबर रोजी शनिवारी आयपीएलचा (Indian Premier League - IPL) पहिला सामना आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings -  CSK) यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी तयारी करण्यात गुंतलेले मुंबईच्या खेळाडूंसोबत अर्जुनचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो बघून चर्चेला उधाण आले आहे. (Arjun Tendulkar in UAE with Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातले सर्व संभ्रम दूर केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघासोबत संयुक्त अरब आमिरातीच्या दौऱ्यावर आहे. अर्जुनची मुंबई इंडियन्स संघाने नेट्समधील सरावासाठी गोलंदाज म्हणून निवड केली आहे. अर्जुन मुंबईच्या खेळाडूंना फलंदाजीचा सराव देण्यासाठी दररोज नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे. वीस वर्षांचा अर्जुन आपले काम चोख बजावत आहे. संघातील खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकरही फिटनेस जपण्यासाठी व्यायाम, स्विमिंग करत आहे. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या फोटोंमध्ये अर्जुनचे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबतचे फोटो आहेत. हे फोटो खरे आहेत कारण अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. 

अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज

अर्जुन तेंडुलकर छान गोलंदाजी करतो. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाच्या खेळाडूंना फलंदाजीचा सराव देण्यासाठी वेगवान गोलंदाजी केली आहे. तसेच त्याने २०१७च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारताच्या महिला क्रिकेटपटूंनाही नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. अलिकडेच नेट्समध्ये त्याने टाकलेला यॉर्कर लागल्यामुळे जॉनी बेअरस्टो याला दुखापत झाली. त्याला सराव सोडून काही तास विश्रांती आणि उपचार घ्यावे लागले.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) उत्तम फलंदाज होता, अधूनमधून गोलंदाजीतही तो चमक दाखवायचा पण अर्जुन गोलंदाजीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची शक्यता दिसत आहे. अर्जुन २०१८ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. कोरोना संकटामुळे आयपीएल खेळत असलेल्या प्रत्येक संघाने स्वतःसोबत नेट्समधील सरावासाठी निवडक खेळाडूंचे पथक सज्ज ठेवले आहे. कोरोनाची तीव्रता वाढली आणि संघातील अनेक खेळाडूंना बाधा झाल्यामुळे पंचाईत झाली तर आयत्यावेळी भारतातून खेळाडूंना बोलावण्याऐवजी नेट्समध्ये सराव देणाऱ्या खेळाडूंचा विशेष परिस्थिती म्हणून आयपीएलसाठी विचार होऊ शकतो. अर्थात ही दुर्मिळ परिस्थिती येऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे, असे मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापनाने सांगितले.

अर्जुन तेंडुलकरसोबत मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२० खेळण्यासाठी व्यावसायिक करार झालेला नाही. त्याची नेट्समध्ये गोलंदाजीसाठी निवड झाली आहे. कदाचित भविष्यात अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळू शकेल, असेही संघ व्यवस्थापनाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी