IPL 2022: अर्जुन तेंडुलकर फिल्डिंगमध्ये गाळतो घाम, एबी बेबी नंतर सचिन 'बेबी'ला पदार्पणाचे वेध

IPL 2022
Updated Apr 08, 2022 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकलेला नाही. आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रूपयांना खरेदी केले होते. 

arjun tendulkar
IPL 2022: एबी बेबी नंतर सचिन 'बेबी'ला पदार्पणाचे वेध 
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची प्रतीक्षा
  • पुढील सामन्यात केकेआरचा सामना करणार मुंबई

मुंबई: पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी(mumbai indians) आयपीएल २०२२(ipl 2022)ची सुरूवात काही चांगली राहिलेली नाही. रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात संघाने आतापर्यंत सुरूवातीचे दोनही सामने गमावले आहेत. आता ६ एप्रिलला आपला तिसरा सामना मुंबई इंडियन्स दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. arjun tendulkar may be debut in ipl 2022

अधिक वाचा - आता १२ तारखेलाच रस्त्यावर होणार 'राज'गर्जना!

मुंबई इंडियन्सचे खेळाडू या सामन्यासाठी जोरदार सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही जोरदार सराव करताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरला डाव्या हाताने कॅच पकडताना जवळचा खेळाडू सूर्यकुमार यादवही हैराण होतो. 

अर्जुनला आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा

अर्जुन तेंडुलकरला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेले नाही. आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाखांना खरेदी केले होते. २० लाखांची बेस प्राईज असलेल्या अर्जुनला खरेदीसाठी गुजरात टायटन्सने बोली लावली होती. मात्र मुंबई इंडियन्सने बाजीमाली. गेल्यावर्षीही अर्जुन २० लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. 

अर्जुन तेंडुलकरचे वडील सचिन तेंडुलकरचे मुंबई इंडियन्सशी खास नाते आहे. सचिन तेंडुलकर आता मेंटॉर म्हणून मुंबई संघासोबत जोडला गेलेला आहे. सचिन २००८-१३ दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. सचिनने मुंबई इंडियन्सासाठी ७८ सामने खेळताना २२३४ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून ऑरेंज कॅप मिळवणरा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू होता. 

अधिक वाचा - IPL 2022: बेसबॉलसारखा हेल्मेट घालून का मैदानात उतरतो कार्तिक

सूर्यकुमार यादव खेळणार तिसरा सामना

मध्यमक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या खेळू शकतो. सूर्यकुमार सामन्याआधी पहिल्या नेट्समध्ये खूप बॅटिंग सराव केला. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर क्रिकेटिंग अॅक्शनमधून बाहेर होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी