Arjun Tendulkar IPL 2022: पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित; रोहित शर्माने दिले संकेत 

IPL 2022
Updated May 18, 2022 | 08:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arjun Tendulkar IPL 2022 । इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेली मुंबई इंडियन्स आता नवीन खेळाडूंना संधी देत आहे.

Arjun Tendulkar's debut in the next match is certain, Hints given by Rohit Sharma 
पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित, रोहितने दिले संकते.
  • रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर अर्जुन तेंडुलकर ट्रेंड होऊ लागला आहे.

Arjun Tendulkar IPL 2022 । मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL2022) च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेली मुंबई इंडियन्स आता नवीन खेळाडूंना संधी देत आहे. मंगळवारी जेव्हा संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळण्यासाठी उतरला तेव्हा २ युवा खेळाडूंसह मैदानात आला. मात्र यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश नव्हता, त्यामुळे अर्जुनचा डेब्यू कधी होणार याबाबतीत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (Arjun Tendulkar's debut in the next match is certain, Hints given by Rohit Sharma). 

अधिक वाचा : ठाणे : घोडबंदर रोडवर अपघात, केमिकल टँकर उलटला

रोहित शर्माने दिले मोठे संकेत

दरम्यान, आता खुद्द कर्णधार रोहित शर्माने मोठे संकेत दिले आहेत, ज्याच्यानंतर चर्चा रंगली आहे की आगामी दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यातून अर्जुन तेंडुलकर पदार्पण करू शकतो. हैदराबादविरूद्धच्या नाणेफेकीदरम्यान रोहित शर्माने म्हटले की आम्ही वारंवार नवीन खेळाडूंना संधी देत आहे कारण आगामी हंगामासाठी सर्वगोष्टी सुरळीत व्हाव्यात. रोहित शर्माने सांगितले, या सामन्यात मयंक मार्कंडये आणि संजय यादव यांना खेळवले जात आहे. तर शेवटच्या सामन्यात देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. मुंबई इंडियन्सला या हंगामातील शेवटचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे.

अर्जुनच्या पदार्पणाच्या चर्चांना उधाण 

रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर अर्जुन तेंडुलकर ट्रेंड होऊ लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण निश्चित असल्याचा अंदाज ट्विटरवरील युजर्संनी लावला. लक्षणीय बाब म्हणजे अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रूपयांमध्ये कायम ठेवले होते. मागील हंगामात देखील अर्जुनला २० लाख रूपयांमध्ये खरेदी केले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. असेच काहीसे आतापर्यंत या हंगामात झाले आहे. मुंबई इंडियन्सने मात्र अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केला असून, त्यानंतर त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते असे संकेत मिळत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी