CSK vs SRH: माही कर्णधार होताच गायकवाड आला रंगात, जडेजाच्या नेतृत्वात ठरला फेल

IPL 2022
भरत जाधव
Updated May 01, 2022 | 22:15 IST

आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) (CSK) दुःस्वप्न ठरला आहे. खराब कामगिरीमुळे रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) सीएसकेचे कर्णधारपद (Captaincy) सोडले. संघाची कमान पुन्हा एकदा एमएस धोनीच्या (MS Dhoni) हाती आली आहे.

gaikwad came to the form, Jadeja failed to lead
CSK vs SRH: माही कर्णधार होताच गायकवाड आला रंगात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक सामन्यात ऋतुराज गायकवाड पराभवाचे कारण ठरत होता,
  • कर्णधार होताच CSK चा मॅच विनर खेळाडू ऋतूराज गायकवाड फॉर्मात आला
  • गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली.

Ruturaj Gaikwad 99 Runs : नवी दिल्ली :  आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) (CSK) दुःस्वप्न ठरला आहे. खराब कामगिरीमुळे रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) सीएसकेचे कर्णधारपद (Captaincy) सोडले. संघाची कमान पुन्हा एकदा एमएस धोनीच्या (MS Dhoni) हाती आली आहे. धोनी  कर्णधार होताच CSK चा मॅच विनर खेळाडू ऋतूराज गायकवाड फॉर्मात आला आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप होता.

सीएसकेचा हा खेळाडू फॉर्मात परतला

आयपीएल 2022 चा 46 वा सामना चेन्नई आणि हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात धोनी सीझन 15 मध्ये प्रथमच कर्णधार आहे. धोनी कर्णधार होताच संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड जबरदस्त लयीत परतला आहे. हैदराबादविरुद्ध गायकवाडने जोरदार शतक केले आहे. ऋतुराजने या सामन्यात 57 चेंडूत 99 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याच्या बॅटने 6 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली.

जडेजाच्या नेतृत्वाखाली ठरला फ्लॉप

ऋतुराज गायकवाडसाठी हा मोसम आत्तापर्यंत खूपच खराब होता. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली ऋतुराजने 8 सामन्यात केवळ 138 धावा केल्या आहेत. या 8 डावांमध्ये त्याला दोनदा खातेही उघडता आले नाही. यादरम्यान त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) प्रत्येक सामन्यात ऋतुराज गायकवाड पराभवाचे कारण ठरत होता, मात्र या खेळीने त्याने पुन्हा एकदा सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जडेजा कर्णधार म्हणून अपयशी 

हंगाम सुरू होण्यापूर्वीच रवींद्र जडेजाला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र निराशाजनक कामगिरीनंतर रवींद्र जडेजाने कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला 8 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आणि 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या 8 सामन्यात जडेजा केवळ 112 धावा करू शकला आणि त्याने फक्त 5 विकेट घेतल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी