Patanjali IPL 2020: आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत बाबा रामदेवांची पतंजलि

IPL 2020
Updated Aug 10, 2020 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Patanjali bids for IPL 2020: पतंजलि यावर्षीच्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत सहभागी झाली आहे. वीवो मागे हटल्यानंतर पतंजलिने या संधीचा फायदा घेत आपला ब्रँड जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. 

baba ramdev
आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत बाबा रामदेवांची पतंजलि 

थोडं पण कामाचं

  • पतंजलिने आयपीएल २०२० टायटल स्पॉन्सरशिपमध्ये भाग घेण्याची इच्छा दर्शवली
  • वीवो मागे हटल्यानंतर पतंजलि या संधीचा फायदा घेऊ इच्छिते
  • पतंजलिशिवाय ११ मोठ्या कंपन्याही या स्पॉन्सरशिपसाठी उत्सुक आहेत. 

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) २०२०(IPL 2020)साठी टायटल स्पॉन्सरच्या(title sponser) शर्यतीत आता पतंजलिचाही(patanjali) समावेश झाला आहे. चीनची कंपनी वीवो(china company vivo) यात मागे हटल्यानंतर आयपीएल आपल्या १३व्या हंगामासाठी टायटल स्पॉन्सरच्या शोधात आहे. त्यातच आता बाबा रामदेव(baba ramdev) यांची कंपनी पतंजलि बोली लावण्यासाठी तयार आहे. 

पतंजलि कंपनीकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पतंजलिचे प्रवक्ता एसके तिजारावाल यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सशी बोलताना सांगितले, या वर्षी आम्ही आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपबाबत विचार करत आहोत. यामुळेआम्ही आमचा ब्रँड पतंजलि जागतिक स्तरावर नेऊ शकतो. तिजारावाल पुढे असंही म्हणाले, यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव पाठवण्याची तयारी करत आहोत. रिपोर्टनुसार बाजार तज्ञ असे मानतात की एका चीनी कंपनीला पर्याय म्हणून राष्ट्रीय ब्रँड पतंजलिचा दावा मजबूत आहे मात्र त्यांचे असेही मानणे आहे की त्यांच्याकडे एखाद्या मल्टिनॅशनल ब्रँड म्हणून स्टार पॉवर कमी आहे. 

वीवो मागे हटल्यानंतर कोणासाठी रस्ते झाले खुले

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादावरून चीनी मोबाईल निर्माता कंपनी वीवोने आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरच्या रूपात मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आयपीएलपासून वीवो वेगळे झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. टायटल स्पॉन्सर म्हणून वीवो दरवर्षी बीसीसीआयला ४४० कोटी रूपये देते. दरम्यान, पुढच्या वर्षी बोर्डाने वीवोचा पुनरागमनाचा रस्ता मोकळा ठेवला आहे. खरंतर वीवो आणि आयपीएलचा करार २०२२ पर्यंत आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सध्या मार्केटची स्थिती चांगली नाही. त्यामुळे वीवो जितका पैसा एका वर्षासाठी देत असे तितके पैसे कदाचित दुसरी कंपनी देऊ शकणार नाही. 

या कंपन्याही स्पर्धेत सहभागी

आयपीएल २०२०च्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी अॅमेझॉन, फँटसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम ११ आणी टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर आणि ऑनलाईन लर्निंग कंपनी बायजूसह अनेक कंपन्या या शर्यतीत आहेत. आता हे पहावे लागेल की आयपीएल २०२० च्या टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार कोणत्या कंपनीच्या हाती लागतील. 

आयपीएल २०२०चा कार्यक्रम

आयपीएल २०२० यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत आयोजित केली जाईल. या दरम्यान महिलांचीही आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल. खेळांडूना सॅनिटाईज वातावरणात राहावे लागेल. सर्व फ्रँचायजी २० ऑगस्टनंतर आयपीएल १३च्या तयारीमध्ये व्यस्त असतील. त्यांना त्यांचे कँप आयोजित करण्यास परवानगी मिळेल. यावेळेस आयपीएलमध्ये खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना भेटणे थोडे कठीण असेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी