RCB vs SRH: आयपीएलमध्ये आज बंगळुरू-हैदराबादमध्ये सामना; हे असू शकतील दोन्ही संघांचे प्लेइंग 11

IPL 2021
भरत जाधव
Updated Oct 06, 2021 | 16:51 IST

आज संध्याकाळी साडेसात वाजता आयपीएलमधील 52 वा सामना खेळला जाईल. केन विल्यमसनचा सनरायझर्स हैदराबादचा सामना विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेंकाना भिडतील.

angalore-Hyderabad match in IPL today
RCB vs SRH: आयपीएलमध्ये आज बंगळुरू-हैदराबाद सामना  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयपीएलमधील 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार
  • टीम सनरायझर्सला पराभूत करुन बंगलोर प्लेऑफमध्ये दुसऱ्यास्थानी जाण्याचा प्रयत्न करेल.
  • हैदराबादचा संघ या आयपीएलमधून पडणारा पहिला संघ ठरला आहे.

अबू धाबी : आज संध्याकाळी साडेसात वाजता आयपीएलमधील 52 वा सामना खेळला जाईल. केन विल्यमसनचा सनरायझर्स हैदराबादचा सामना विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेंकाना भिडतील. एकीकडे विराटची टीम बँगलोरने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर केनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ या आयपीएलमधून पडणारा पहिला संघ ठरला आहे.

आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अबू धाबीच्या स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर फलंदाजांनी आतापर्यंत भरपूर धावा केल्या आहेत, आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन धावांचा पाठलाग करणे पसंत करेल.
या सामन्यात विराट कोहलीची टीम सनरायझर्सला पराभूत करुन बंगलोर प्लेऑफमध्ये दुसऱ्यास्थानी जाण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पॉईंट टेबलमध्ये हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानी आहे. बंगळुरूच्या संघाची झेप अडविण्याचा प्रयत्न हैदराबाद करेल. 

असे असू शकतात 11 खेळाडू

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीकल, श्रीकर भारत (विकेटकिपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डेन ख्रिश्चन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद - जेसन रॉय, रिद्धिमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक.

दोन्ही संघ बदल न करता उतरू शकतात

बंगळुरूचा संघ कोणत्याही बदलाशिवाय या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. या सामन्यात संघ मधल्या फळीत स्फोटक फलंदाज मॅक्सवेलकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा करेल. त्याचबरोबर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स फॉर्मात येण्याचीही टीमची अपेक्षा असेल. हैदराबादचा संघदेखील या सामन्यात कोणताही बदल न करता खेळू शकतो. या सामन्यात सर्वांची नजर हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकवर असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी