IPL 2020मधून बीसीसीआयने कमावले तब्बल इतके कोटी रूपये, टीव्ही व्ह्यूअरशिपमध्ये २५ टक्के वाढ

IPL 2020
Updated Nov 23, 2020 | 17:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2020: बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमळ हे आयपीएल २०२०च्या यशस्वी आयोजनानंतर खूप खुश आहेत. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. 

Ipl 2020
IPL 2020मधून बीसीसीआयने कमावले तब्बल इतके कोटी रूपये 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२०मधून बीसीसीआयने ४ हजार कोटी रूपये कमावले
  • कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते
  • भारत-चीन सीमेवरील तणावामुळे आयपीएलचे टायटल स्पॉन्सरही हिसकावण्यात आले होते

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)२०२०(Ipl 2020)च्या सुरूवातीपासून अनेक प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात होते की या स्पर्धेचे आयोजन कसे असेल. एक वेळ अशी होती की आयपीएलकडे टायटल स्पॉन्सरशिपही(ipl title sponcership) नव्हती कारण भारत-चीन सीमेवरील तणावामुळे व्हिवोकडून हे स्पॉन्सरशिप काढून घेण्यात आली होती. मात्र सर्व अडथळे पार करत यूएईमध्ये(uae) आयपीएल खेळवण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालली. 

आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याचे आयोजन केल्याबाबत समाधानी दिसला. कॉस्ट कटिंग असतानाही जगातील सर्वात श्रीमंत मंडळाने ४००० हजार कोटी रूपये कमावले तसेच टीव्ही व्ह्यूव्हरशिपमध्ये २५ टक्के नफा मिळवला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सने यांच्यात अबुधाबी येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात व्ह्यूव्हरशिपने रेकॉर्डतोड काम केले. 

आयपीएलच्या आयोजनासाठी आभार मानले- धुमाळ

अरूण धुमाळ यांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने सांगितले की, बोर्डाला गेल्या आयपीएलच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के कॉस्ट कटिंग करावी लागली. आम्ही कोरोनाकाळात ४ हजार कोटी रूपये कमावलेत. आमची टीव्ही व्ह्यूव्हरशिप २५ टक्क्यांनी वाढली. सगळ्यात जास्त व्ह्यूव्हरशिप मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान झाली. आमच्यावर जे संशय घेत होते त्यांनी आमचे आयपीएलच्या आयोजनासाठी आभार मानलेत. जर आयपीएल नसेते तर क्रिकेटर्सचे एका वर्षाचे नुकसान झाले असते. 

बहुतांश संघामध्ये ४०हून अधिक सदस्य होते तर मुंबई इंडियन्समध्ये सर्वाधिक १५० जण होते. यात हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट आणि शिंपी यांचा समावेश होता. आपात्कालीन स्थितीसाठीही सर्व सुविधा होत्या. अरूण धुमाळ म्हणाले जर आमच्याकडे कोणी कोरोनाशी संबंधित प्रकरण सापडले असते तर बोर्डाला २०० रूम ब्लॉक करावे लागले असते. ज्यामुळे कोरोना रुग्णांला क्वारंटाईन करता येईल आणि संपूर्ण फिट झाल्यानंतरच ती व्यक्ती परतली असती. 

आयपीएलची सुरूवात चांगली नव्हती कारण चेन्नई सुपरकिग्सचे अनेक सदस्य कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान, संकटाच्या वेळेस योग्य पावले उचलण्यात आली. धुमाळ म्हणाले, जेव्हा आम्ही ही बातमी ऐकली तेव्हा प्रयत्न केला की स्थिती अधिक गंभीर होऊ नये. आम्हाला सांगितले गेले की सर्वामध्ये छोटीसी लक्षणे आहेत. त्यानंतर हे सगळे होमआयसोलेशनमध्ये गेले. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमांचे पान केले. आम्ही यूएईचे आभार मानतो की ते आमच्यासोबत उभे राहिले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी