बीसीसीआयला वाटतेय T20 World Cup ची भीती, आयपीएल संघाना लिहिलेय पत्र

IPL 2021
Updated Sep 24, 2021 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल २०२१चा सेकंड हाफ संपताच यूएईमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे अधिकतर खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. 

t 20 world cup
बीसीसीआयला वाटतेय T20 World Cup ची भीती 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने सर्व संघांना टी-२० वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये सामील असलेल्या खेळाडूंवरील वर्कलोड कमी करण्याची मागणी केली आहे. 
  • बीसीसीआयच्या या मागणीचा परिणाम आयपीएल २०२१च्या सेकंड हाफमधील पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाला.
  • पहिल्याच सामन्यात रोहितला आराम देणे हा मुंबईचा चांगला विचार होता.

मुंबई: आयपीएल २०२१चा सेकंड हाफ यूएईमध्ये खेळवला जात आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला असणार आहे. यानंतर दोन दिवसांनी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होईल. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आणि या संघात निवडण्यात आलेले अधिकतर खेळाडू हे सध्या आयपीएलमध्ये सहभागी आहेत. अशातच या खेळाडूंना दुखापत आणि वर्कलोडपासून बचावासाठी बीसीसीआयने सर्व फ्रेंचायजींना एक पत्र लिहिले आहे. यात बीसीसीआयने सर्व संघांना टी-२० वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये सामील असलेल्या खेळाडूंवरील वर्कलोड कमी करण्याची मागणी केली आहे. 

बीसीसीआयच्या या मागणीचा परिणाम आयपीएल २०२१च्या सेकंड हाफमधील पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या खेळले नव्हते. इनसाईड स्पोर्टच्या माहितीनुसार हा केवळ योगायोग नव्हता. या दोन्ही खेळाडूंना टी-२० वर्ल्डकप लक्षात गेता फ्रेंचायजीने आराम दिला होता. 

बीसीसीआयने रोहित शर्माचा वर्कलोड मॅनेज करण्यास सांगितले

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले, रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. याच कारणामुळे त्याच्याबाबत कोणतीही जोखीम घेतली जाणार नाही. पहिल्याच सामन्यात रोहितला आराम देणे हा मुंबईचा चांगला विचार होता. रोहित सध्या आपल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. आम्ही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स दोघांनाही हा सल्ला दिला की आमच्यासाठी टी-२० वर्ल्डकप ही प्राथमिकता आहे. जितके शक्य होईल तितके खेळाडूंवरील वर्कलोड कमी करा. मुंबई इंडियन्सने रोहित आणि हार्दिकला पहिल्या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटचा होता असे सांगितले होते. मात्र खरे कारण वर्क लोडशी जोडलेले होते. 

हार्दिक पांड्याचा फिटनेस

पांड्याच्या गैरहजेरीत त्याच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले जात आहेत. यामुळे केवळ रोहित शर्माच नव्हे तर टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या समस्येतही वाढ दिसत आहे. कारण पांड्या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये सामील एकमेव वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर आहे. ज्या पद्धतीने यूएईमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळत आहे ते पाहता त्याचे दुखापतग्रस्त होणे भारतीय संघासाठी त्रासदायक ठरू शकते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी