BCCI बदलणार IPL सामन्यांचे टायमिंग, जाणून घ्या काय असेल नवी वेळ

IPL 2022
Updated May 19, 2022 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयपीएलच्या सामन्यांच्या वेळा बदलणार आहे. दरम्यान हे आयपीएल २०२३ दरम्यान लागू होणार आहे आणि सामने आधीप्रमाणे संध्याकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार. 

ipl
BCCI बदलणार IPL सामन्यांचे टायमिंग, काय असेल नवी वेळ 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलच्या सामन्यांचा नवा टायमिंग पहिल्यासारखा होणार आहे.
  • बीसीसीआयची आवडीच्या वेळेनुसार आयपीएलचे सामने रात्री ८ वाजता सुरू होतील
  • बीसीसीआयने हे ही सांगितले की ते एकाच दिवशी डबल सामने ठेवणार नाहीत मात्र दुपाऱचे सामने ४ वाजता सुरू होतील. 

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने(Bcci) संभाव्य प्रसारणकर्त्यांना सूचि केले आहे की पुढील वर्षापासून आयपीएलचे सामने(ipl matches) सुरू करण्याचा वेळ बदलणार आहे. आयपीएलच्या सामन्यांचा नवा टायमिंग(new timing) पहिल्यासारखा होणार आहे. बीसीसीआयची आवडीच्या वेळेनुसार आयपीएलचे सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. बीसीसीआयने हे ही सांगितले की ते एकाच दिवशी डबल सामने ठेवणार नाहीत मात्र दुपाऱचे सामने ४ वाजता सुरू होतील. BCCI will change timing for ipl matches

अधिक वाचा - घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ

सध्याच्या वेळेस आयपीएल २०२२बाबत बोलायचे झाल्यास संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतात तर दुपारच्या सामन्याची वेळ साडेतीन आहे. यातील अर्धा तास टॉसचे आयोज असते. मात्र आम्ही पुढील वर्षी बघणार की ज्या दिवशी डबल हेडर सामने असेल तर दुपारचा सामना ४ वाजता सुरू होईल तर रात्रीचा सामना ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या मागचे कारण प्राईम टाईमचा चांगला वापर आहे. 

क्रिकबझच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयने आयपीएल २०२३ ते २०३७ या चक्रासाठी ब्रॉडकास्टिंग राईट्स खरेदी करण्यात रस असलेल्या पार्टींना सूचना दिली आहे. डबल हेडरसाटी बीसीसीआयच्या आवडीची वेळ संध्याकाळी ४ आणि रात्री ८ वाजण्याची आहे. आयपीएलच्या पहिल्या १० हंगामात हा टायमिंग पाहायला मिळाला होता. येथे दुपारी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता सामने सुरू होत. 

अधिक वाचा - ग्रहांचा सेनापती मंगळ 17 मे रोजी मीन राशीत करेल प्रवेश

केवळ पाच वर्षांसाठी दुसऱ्या चक्रात स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरच्या विनंतीवरून सुरूवातीच्या वेळेच्या आधी करण्यात आला होता. स्टार स्पोर्ट्सने १६३४७ कोटी रूपये मीडिया राईट्ससाठी दिले होते. अशातच बोर्डाला या मागणीपुढे झुकावे लागले होते. कारण स्टारने असा तर्क लावला होता की सध्याकाळी साडेसात वाजता प्राईम टाईममध्ये अतिरिक्त ३० मिनिटांची वेळ मिळेल जेव्हा प्रेक्षकांची संख्या वाढते आणि यामुळे जाहिरातीही खूप मिळतात. 

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी