Big increase in number of people watching IPL Live Streaming on Mobile App than TV, new record of audience : आयपीएल 2023 स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. यंदा टीव्हीपेक्षा मोबाईल अॅपवर आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण) बघणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग बघणाऱ्या प्रेक्षकांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
'न्यूज 18'च्या रिपोर्टनुसार टीव्हीवर आयपीएल लाईव्ह बघणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. याउलट मोबाईल अॅपवर आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण) बघणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर आयपीएल लाईव्ह दाखवली जात आहे. तसेच जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण) होत आहे.
आयपीएलसाठी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या पसंतीआधारे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलना यंदा 7.6 रेटिंग मिळाले आहे असे वृत्त 'न्यूज 18'ने दिले आहे. याआधी 2021-22 मध्ये टीव्हीला 5.57 रेटिंग मिळाले होते. आयपीएलसाठी टीव्हीला मिळालेले यंदाचे रेटिंग हे आतापर्यंतच्या सर्वात कमी रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलसाठी टीव्हीला 2020 मध्ये 8.29 आणि 2019 मध्ये 10.36 रेटिंग मिळाले होते.
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या पहिल्या मॅचचा पहिला डाव सुरू असताना टीव्हीच्या एकूण प्रेक्षकांपैकी 22 टक्के प्रेक्षक मॅच बघत होते. संपूर्ण मॅचच्या काळात टीव्हीच्या एकूण प्रेक्षकांपैकी 23.1 टक्के प्रेक्षक मॅच बघत होते. स्टार स्पोर्ट्सच्या दाव्यानुसार पहिली मॅच टीव्हीवर 140 दशलक्ष (मिलियन) प्रेक्षकांनी लाईव्ह बघितली. मॅचच्या काळात टीव्ही बघणाऱ्यांचे प्रमाण 47 टक्क्यांनी वाढले होते. टीव्ही रेटिंग 39 टक्क्यांनी वाढले होते.
तर दुसरीकडे जिओ सिनेमा या आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या मोबाईल अॅपने प्रेक्षकांच्या माध्यमातून नव्या विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या पहिल्या दिवशी अॅपच्या व्ह्युअरशिपमध्ये 50 कोटींपेक्षा जास्त एवढी वाढ दिसून आली. तसेच आयपीएलच्या पहिल्या दिवशी 2.5 दशलक्ष (मिलियन) प्रेक्षकांनी जिओ सिनेमा हे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घेतले. मॅचच्या निमित्ताने 6 कोटी युनिक युझर लाईव्ह स्ट्रिमिंग बघत होते. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाने डिस्ने प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपचे विक्रम मोडीत निघाले, असे वृत्त 'न्यूज 18'ने दिले आहे.
IPL 2023 मध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या महिला
IPL मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मिस्ट्री गर्ल्स
IPL ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिले आहे?